AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धाराशिव हादरलं! गॅस एजन्सी धारकाचा टोकाचा निर्णय; विष पिऊन जीव देण्याचा प्रयत्न

Dharashiv News : धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गॅस एजन्सी धारकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या डीलरने हे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

धाराशिव हादरलं! गॅस एजन्सी धारकाचा टोकाचा निर्णय; विष पिऊन जीव देण्याचा प्रयत्न
LPG DharashivImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 08, 2026 | 10:32 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतातही नैसर्गिक वायुची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे सरकारने LPG वितरणावर निर्बंध लादले आहेत. व्यावसायिक गॅसचा पुरवठा मर्यादित करण्यात आला आहे. तसेच घरगुती गॅसता पुरवठा सुरळित राहण्यासाठी महत्त्वाच्या उपाय योजना लागू केल्या जात आहेत. असं असलं तरी अनेक गॅस एजन्सीच्या समोर लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. अशातच आता धाराशिवमधून एक धक्कादायक घटना संमोर आली आहे. एका गॅस एजन्सी धारकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गॅस एजन्सी धारकाचा आत्महत्येचा प्रयत्न

धाराशिव जिल्ह्यातील काटी सावरगावातील एका गॅस एजन्सी धारकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. कंपनीसोबत सर्व डीलर्सची व्हिसी सुरू असताना त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील सर्व डीलर्ससोबत प्रशासनाने बैठक बोलावली होती. यात सर्व डीलर्सनी अडचणी सांगितल्या असच्याची माहिती एचपी डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय स्वामी यांनी दिली आहे.

आम्हाला कंपनीचा त्रास नसून ग्राहकांचा मोठा ताण आहे – संजय स्वामी

एचपी डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय स्वामी यांनी म्हटले की, ‘आत्ताच आमची बैठक पार पडली त्यात आम्ही आमच्या अडचणी सांगितल्या. आमच्या एका डीलरने आज आत्महत्येचा प्रयत्न केला त्याचे आम्ही समर्थन करत नाही. त्यांच्या कुटूंबीयांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला. मुळात आम्हाला कंपनीचा त्रास नसून ग्राहकांचा मोठा ताण आहे. लोकं आमच्या एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लावून बसत आहेत.’

गॅसचा मुबलक साठा आहे – संजय स्वामी

पुढे बोलताना संजय स्वामी यांनी म्हटले की, ‘अनेक ग्राहकांचे केवायसी होत नसल्याने नागरिक आम्हाला जाब विचारत आहेत. आज दिवसभर कंपनीची साईट बंद पडल्याने ग्राहकांकडून आमच्यावर दबाव टाकला जात आहे. त्यातून हा प्रकार घडला आहे. ग्राहकांना आवाहन आहे की तुम्ही आमच्यावर प्रेशर टाकू नका, गॅसचा मुबलक साठा आहे.’

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप