AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC पेपर फुटी प्रकरण, आरोपीशी कनेक्शन समोर आल्यावर मंत्री नरहरी झिरवळ यांच्या OSD चा खुलासा

MPSC Drug Inspector paper leak case: एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले मंत्री नरहरी झिरवळ यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. काय केला त्यांनी खुलासा?

MPSC पेपर फुटी प्रकरण, आरोपीशी कनेक्शन समोर आल्यावर मंत्री नरहरी झिरवळ यांच्या OSD चा खुलासा
MPSC पेपर फुटी प्रकरण मंत्री नरहरी झिरवळImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 05, 2026 | 1:06 PM
Share

गौतम भैसाणे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले मंत्री नरहरी झिरवळ यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही असा दाव गणेश देवरे यांनी केला आहे. आपण गौरव पाटील यांचा भाडेकरू आहे, हे खरं; मात्र या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सुद्धा देवरे यांनी केली. तर यापूर्वी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी सुद्धा त्यांचा आणि मंत्रालयाचा या पेपरफुटीशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला.

पेपरफुटीसोबत दुरान्वयेही संबंध नाही

गौरव पाटील यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणे हा केवळ योगायोग आहे. या प्रकरणाशी माझा दूरान्वयेही संबंध नाही, असा खुलासा गणेश देवरे यांनी केला आहे. माझी बदनामी करणार्‍यांना कायदेशीर नोटीस बजावणार असा इशाराही देवरे यांनी दिला. मी दोषी नसल्याने कुठेही गेलेलो नाही. नंदुरबारमधील माझ्या घरीच असल्याचा दावा त्यांनी केला. गौरव पाटील आरोपी आहे आणि मी त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहतो, यात माझा काय दोष? असा सवाल त्यांनी विचारला. या प्रकरणाची गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. मी सहभागी असतो तर नंदुरबारमध्ये थांबलो असतो का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

मंत्री नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया काय?

मंत्री नरहरी झिरवळ यांनी याविषयी टीव्ही 9 मराठीशी बोलताना पेपरफुटीशी कुठलाच संबंध नसल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाचा, कर्मचाऱ्यांचाही संबंध नाही. कारण सर्व विभागातील भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात येते. त्यामुळे या प्रक्रियेशी आपल्या खात्याचा आणि आपला काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया मंत्री झिरवळ यांनी दिली.

एकूण 7 जणांना अटक

अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक (गट-ब) परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये MPSC च्या अधिकाऱ्यांसह लाभार्थी परीक्षार्थी ऋतुजा पाटील हिला सुद्धा अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात 7 जणांना अटक केली आहे. एमपीएससीचे सहसचिव, अवर सचिव अभिजित लेंडवे, सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, गोपाल मराठे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना अगोदरच अटक करण्यात आली आहे. कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील, अमृत पाटील आणि गौरव पाटील यांनाही अगोदरच अटक करण्यात आली आहे.

Follow Us
ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; शाळेतूनच प्रो-गोविंदा...
Dahi Handi in Thane | ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; गोविंदांना शाळेतूनच प्रो-गोविंदा प्रशिक्षण, लक्ष्य थेट...
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी; प्रत्येक कलाकाराचे...
कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश
Krushi Exam | एका पेपरला एक परीक्षक, तर काहींना तीन? कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट...
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट; राज्यभरात गोविंदांचा उत्साह
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधारावर तब्बल...
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...