मुंबई पुस्तक महोत्सवात देवेंद्र फडणवीस यांच्या ३ पुस्तकांचे डिजिटल प्रदर्शन चांगलंच गाजतंय…
अर्थसंकल्प सोप्या भाषेत, आत्मनिर्भर महाराष्ट्र आणि भारतीय संविधान गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या देवेंद्र फडणवीस यांच्या ३ पुस्तकांचे डिजिटल एक्सपीरियंस प्रदर्शनाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे.

वाचन संस्कृतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत तरुण पिढीपर्यंत पुस्तकांमधील ज्ञान पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम मुंबई पुस्तक महोत्सवात पाहायला मिळत आहे. ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’, ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र’ आणि ‘भारतीय संविधान गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लिहिलेल्या तीन पुस्तकांचे डिजिटल एक्सपीरियन्स प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या तिन्ही पुस्तकांची माहिती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून मुंबई पुस्तक महोत्सवात दिली जात आहे.
चाटबॉट, इंटरॅक्टीव व्हिडिओ, मनोरंजनात्मक गेम्स अशा अनेक आकर्षक माध्यमांद्वारे या तिन्ही पुस्तकांचे प्रदर्शन मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहे.वाचन संस्कृतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे हे प्रदर्शन, आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी वरील तिन्ही पुस्तके वाचकांसाठी डिजिटल स्वरूपात मोफत उपलब्ध आहेत. २९ तारखेपर्यंत हे प्रदर्शन ‘मुंबई पुस्तक महोत्सवात’ अनुभवता येणार आहे.
अर्थसंकल्प सोप्या भाषेत, आत्मनिर्भर महाराष्ट्र आणि भारतीय संविधान गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या तिन्ही पुस्तकांसंदर्भात माहिती तरुण पिढीला डिजिटल स्वरुपात दिली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ही तिन्ही पुस्तके चाटबॉट, इंटरॅक्टीव व्हिडिओ, मनोरंजनात्मक गेम्स अशा अनेक आकर्षक माध्यमांद्वारे या प्रदर्शनात मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. वाचन संस्कृतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे हे प्रदर्शन, आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी वरील तिन्ही पुस्तके वाचकांसाठी डिजिटल स्वरूपात मोफत उपलब्ध आहेत. येत्या २९ तारखेपर्यंत हे डिजिटल प्रदर्शन मुंबई पुस्तक महोत्सवात अनुभवता येणार आहे.
वाचन संस्कृतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत तरुण पिढीपर्यंत पुस्तकांमधील ज्ञान पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम मुंबई पुस्तक महोत्सवात पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’, ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र’ आणि ‘भारतीय संविधान : गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या तीन महत्त्वपूर्ण पुस्तकांमधील माहिती आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) माध्यमातून या पुस्तकांमधील आशय अधिक रंजक आणि संवादात्मक पद्धतीने सादर केला जात आहे. चॅटबॉट, इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ आणि मनोरंजनात्मक गेम्स अशा विविध डिजिटल माध्यमांतून पुस्तकांमधील माहिती जाणून घेण्याची संधी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या मुंबईकरांना मिळत आहे. त्यामुळे पारंपरिक वाचन संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अनोखा संगम या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे, ही तिन्ही पुस्तके प्रदर्शनस्थळी वाचकांसाठी डिजिटल स्वरूपात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत. येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत मुंबई पुस्तक महोत्सवात या अनोख्या डिजिटल प्रदर्शनाचा अनुभव घेता येणार आहे.