AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Salian Death Case : दिशा सालियान प्रकरणाचा तपास CBI कडे देताना हाय कोर्टाने काय म्हटलय? वकिलाने दिली महत्वाची माहिती

Disha Salian Death Case : दिशा सालियान प्रकरणात महत्वाची अपडेट आहे. आज उच्च न्यायालायाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल दिला. दिशा सालियनचे वडिल सतीश सालियान यांनी याचिका दाखल केली होती.

Disha Salian Death Case : दिशा सालियान प्रकरणाचा तपास CBI कडे देताना हाय कोर्टाने काय म्हटलय? वकिलाने दिली महत्वाची माहिती
Disha Salian Death Case
| Updated on: Sep 02, 2026 | 12:04 PM
Share

महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण आणि सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय असलेल्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणात महत्वाची अपडेट आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज या प्रकरणात महत्वाचा आदेश दिला. मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीसीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद करुन या प्रकरणाचा तपास केला होता. पण दिशा सालियनचे वडिल सतीश सालियन मुंबई पोलिसांच्या तपासावर समाधानी नव्हते. आपल्या मुलीसोबत चुकीच घडलंय, तिची हत्या झालीय असं सतीश सालियन यांचं म्हणणं होतं. म्हणून सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

आज उच्च न्यायालायाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. सतीश सालियन यांच्यावतीने युक्तीवाद करणारे त्यांचे उच्च न्यायालयातील वकिल निलेश ओझा यांनी हायकोर्टाच्या आदेशाबद्दल माहिती दिली. निलेश ओझा यांनी माडियाशी बोलतानाच आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं. “आज उच्च न्यायालयाने सीबीआयला निर्देश दिले आहेत की, सतीश सालियान यांची जबानी नोंदवून त्याआधारे एफआयर नोंदवावा. ज्या व्यक्तींच्या विरोधात पुरावे असतील त्यांच्याविरोधात कारवाई करावी” “जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत किंवा सीबीआयचा तपास नकारात्मक वाटला तर आम्हाला प्रोटेस्ट याचिका दाखल करण्याचा अधिकार असेल” असं वकिल निलेश ओझा यांनी सांगितलं.

पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद का केली?

“कोणालाही आरोपी म्हणून वागणूक देऊ नये, फक्त जबाब नोंदवा. तपास करून योग्य तो निष्कर्ष काढा, मग आरोपपत्र दाखल करा,” असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर वेळोवेळी अनेक आरोप करण्यात आले आहेत. आदित्य ठाकरे मात्र यावर कधीच काही बोलले नाहीत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. आज न्यायाधीश सारंग कोटवाल आणि न्यायाधीश रणजीतसिंह राजा भोसले यांच्या खंडपीठाने प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच आदेश दिला. कुटुंबियांनी आरोप करुनही मुंबई पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर का नोंदवला नाही?. सालियन कुटुंबाचा सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप असताना पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद का केली? असा सवाल वकिल निलेश ओझा यांनी विचारला.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,