मोठी बातमी! मातोश्रीवर वातावरण तापलं; दोन गट थेट भिडले, उद्धव ठाकरेही प्रचंड संतापले, नेमकं काय घडलं?
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर शिवसेना ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या गटात चांगलीच बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. मोठी बातमी समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर शिवसेना ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या गटात चांगलीच बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे वातावरण तापल्याचं पहायला मिळालं. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज ठाणे आणि कल्याणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीमध्ये ही घटना घडली आहे. दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील संताप व्यक्त करत या पदाधिकाऱ्यांना सुनावलं आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भांडणाऱ्या आपल्या पदाधिकाऱ्यांना कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापक अभिजीत दिपके यांचं उदाहारण दिलं, देशातील एक तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतोय आणि तुम्ही भांडतायेत काय? तुमच्या वागण्याला काही अर्थ आहे का? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये उपस्थित केला. दरम्यान या घटनेमुळे काही काळ बैठकीत चांगलंच वातावरण तापल्याचं पहाय मिळालं.
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी दुसरा सर्वात मोठा धक्का होता. दरम्यान त्यानंतर आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख तसेच विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख यांची बेैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज कल्याण आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या दोन गटात राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला असून, पदाधिकाऱ्यांना सुनावलं आहे.