नटसम्राटाची एक्झिट, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला (Dr Shriram Lagoo passed away).

नटसम्राटाची एक्झिट, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं निधन
Follow us
| Updated on: Dec 17, 2019 | 11:41 PM

पुणे : ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला (Dr Shriram Lagoo passed away). राहत्या घरी ह्रदय विकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपट सृष्टीसह विविध स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे (Dr Shriram Lagoo passed away). श्रीराम लागू यांच्यावर गुरुवारी (19 डिसेंबर) अंत्यसंस्कार होणार आहेत.

डॉ. लागू त्यांच्या अखेरच्या काळातही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत राहिले. त्यांचा मुलगा तन्वीर लागू यांच्या स्मृतीत दिला जाणारा तन्वीर सन्मान पुरस्कार सोहळा त्यांचा अखेरचा जाहीर कार्यक्रम ठरला. लागू त्यांच्या सामाजिक बांधिलकीसाठी आणि स्पष्ट सामाजिक राजकीय भूमिकांसाठीही ओळखले जात.

लागू यांनी वेळोवेळी नेहमीच आपल्या कृतीतून सामाजिक संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठ्या अडचणीत काम करावं लागतं. ते करावं लागू नये म्हणून  ज्येष्ठ अभिनेते निळू फुले आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत त्यांनी सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना केली. यातून दरवर्षी तळागाळात सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना मानधन देण्यात येतं.

सामाजिक कृतज्ञता निधीचे कार्यवाह आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी देखील लागू यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आर्थिक शिष्यवृत्ती, प्रशिक्षण आणि पुरस्कार देण्यासाठी स्थापन झालेल्या सामाजिक कृतज्ञता निधीचे डॉ लागू संस्थापक अध्यक्ष होते. हा निधी उभा करण्यात त्यांनी मोठा हातभार लावलाच त्याचबरोबर वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय पध्दतीने विचार करण्याची सवय कार्यकर्त्यांना लागावी यासाठी ते कार्यकर्त्यांशी सतत संवाद करायचे. त्यांच्या परखड बुध्दीप्रामाण्यवादी विचारांचा मोठा वारसा आम्हा कार्यकर्त्यांना सतत मार्गदर्शन करत राहील.”

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी लागू यांचं जाणं अत्यंत दुखद असल्याची भावना व्यक्त केली. तसेच रंगभूमीवर शिस्त शिकवणारा अभिनेता केल्याचं मत व्यक्त केलं. डॉ. लागू यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

डॉ. श्रीराम लागू कोण होते? 

डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 मध्ये सातारा येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेतले. 1950 च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रियांचं प्रशिक्षण घेतलं आणि पुण्यात पाच वर्ष कामही केलं. त्यानंतर ते कॅनडा आणि इंग्लंडला पुढील शिक्षणासाठी गेले.

1960 च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरु होता. त्यानंतर 1969 मध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्र सोडून पूर्णपणे नाटकात काम करण्यास सुरुवात केली. पुण्यातील पी.डी.ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. डॉ. श्रीराम लागू यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शनही केलं.

वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. त्यानंतर त्यांनी अनेक नाटकांमध्ये, मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. शांताराम बापूंच्या ‘पिंजरा’ या सिनेमातील लागूंच्या अभिनयानं तर त्यांना घराघरात नेलं. ‘पिंजरा’ सिनेमातील त्यांच्या अभिनयाने ते यशाच्या शिखरावर पोहोचले. ‘पिंजरा’ व्यतिरिक्त त्यांचे ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘मुक्ता’ हे सिनेमेही चांगलेच गाजले. अभिनयाशिवाय डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले.

श्रीराम लागू यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले. अभिनयासोबतच लागू यांनी अनेक पुस्तकंही लिहीली. त्यात झाकोळ, रूपवेध, लमाण या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी वेळोवेळी तत्कालीन सामाजिक राजकीय विषयांवर लेखही लिहिले.

लागू यांनी नेहमीच आपली स्पष्ट भूमिका जाहीरपणे मांडली. ते विज्ञानवादी विचारसरणीचे होते. त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मुलन समितीतही सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी अनेक अंधश्रद्धांवर घाव घालत प्रबोधनाचं काम केलं. बुवाबाजीमुळे देवाचं बाजारीकरण झाल्याचंही त्यांनी वेळोवेळी सांगितलं. देवाच्या नावाने व्यापार करणारे धूर्त लोक हेच खरे समाजाचे शत्रू असल्याचं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. त्यातूनच त्यांनी देव या संकल्पनेबाबत स्पष्ट भूमिका घेत ‘देवाला रिटायर करा’ नावाचा लेखही लिहिला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.