AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबाराचा थरार, वाळू माफियाचा शेतकऱ्यांवर हल्ला; नेमकं काय घडलं?

शेतकरी कृषी पंप चालू करण्यासाठी गेल्यानंतर वाळूमाफियांनी शेतकऱ्यावर गंभीर मारहाण करून त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव गोदावरी नदीपात्रात घडली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबाराचा थरार, वाळू माफियाचा शेतकऱ्यांवर हल्ला; नेमकं काय घडलं?
Sand Mafia Attacks Farmers
| Updated on: May 24, 2026 | 10:32 PM
Share

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशावरून मोठी चकमक उडाली. शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपींना बेदम चोप देत मुख्य आरोपीला पकडले. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बाभुळगाव येथील शेतकरी जालिंदर कुंजीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते काल 23 मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ते गोदावरी नदीकाठावरील शेतात मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आवाज दिल्यानंतर आरोपींनी त्यांना पकडून शिवीगाळ करीत लाकडी दांडके आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांचे अपहरण करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप कुंजीर यांनी केला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच फिर्यादी कुंजीर यांचे नातेवाईक आणि गावकरी घटनास्थळी पोहोचले. यावेळी गावकरी आणि वाळूमाफियात जोरदार राडा झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आरोपींनी बंदुकीतून दोन राऊंड फायर करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शेतकऱ्यावर हल्ला केल्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मुख्य आरोपी अर्जुन दाभाडे याला पकडून मारहाण केली. मात्र, जीव वाचवत त्याने तेथून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.

अपक्ष नगरसेवकाचा हल्ला

या प्रकरणी अर्जुन दाभाडे, उद्देश मंडलिक, महेश गायकवाड, विकास उर्फ विकी ढमके, राहुल चव्हाण, विजय उर्फ भोगर हटांगळे, मंगेश साळवे, विजय पवार आणि राहुल थोरात अशा 9 जणांविरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील असल्याची माहिती आहे. दरम्यान, मुख्य आरोपी अर्जुन दाभाडे हा श्रीरामपूर नगरपालिकेचा अपक्ष नगरसेवक असून त्याच्यावर यापूर्वी खूनासह विविध गंभीर दाखल असून तो या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे सांगण्यात येते.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ