AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं! राज्यात उद्या दुष्काळ जाहीर होणार, शेतकऱ्यांना काय काय मिळणार? देवेंद्र फडणवीसांचा मेगा प्लॅन समोर

मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी दुष्काळासंदर्भात जीआर काढला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या फडणवीस हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत.

ठरलं! राज्यात उद्या दुष्काळ जाहीर होणार, शेतकऱ्यांना काय काय मिळणार? देवेंद्र फडणवीसांचा मेगा प्लॅन समोर
Devendra FadnavisImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 24, 2026 | 4:01 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी दुष्काळासंदर्भात जीआर काढला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या फडणवीस हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. अमरावती विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. पिकांची परिस्थिती अतिशय खराब आहे. विशेष: सोयाबीन असेल, काही भागातील कापूस असेल उडीद असेल, तूर असेल सगळ्या पिकांवर आपल्याला या ठिकाणी संकट पहायला मिळत आहे. म्हणूनच हा दौरा करून शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, हा आमचा प्रयत्न आहे. आपली दुष्काळाची जी संहिता आहे, त्या संहितानुसार ट्रिगर वन प्रमाणे दुष्काळ जाहीर करण्याचा जो काही शासन आदेश आहे, तो आदेश आम्ही काढणार आहोत, असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

कदाचित त्यामध्ये एखादा दुष्काळी भाग सुटला तर ट्रिगर थ्री प्रमाणे आम्ही त्या भागाचा समावेश करू, पण सकृतदर्शनी राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ दिसून येत आहे, असा सर्व भाग जिथे दुष्काळ दिसत आहे, त्या सर्व भागाचा समावेश आम्ही यामध्ये करणार आहोत. शेतकऱ्यांना आपल्याला वेगवेगळी मदत करावी लागणार आहे. विशेष: चाऱ्याची टंचाई, पाण्याची टंचाई या संदर्भांत आपण कार्यवाही करणार आहोत, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कुठेही अन्नधान्याची कमतरता पडू नये यासाठी आपण मदत करणार आहोत. शेतकऱ्यांना जी थेट मदत करायची आहे, हेक्टरी ती देखील आम्ही त्यांना करणार आहोत. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, यासाठी देखील आम्ही उपाययोजना करणार आहोत. या सर्व उपाययोजना करत असताना ज्या भागात पाणी उपलब्ध होईल, अशा भागात रब्बीचा पेरा करता येईल, त्यासाठी देखील आम्ही मदत करणार आहोत. सध्या राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त काम काढून रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश