AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरातभोवती सर्वात मोठा फास, आता ईडीकडे…अखेर कोर्टाने तो निर्णय घेतलाच!

Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात अशोक खरातचा पाय आणखी खोलात असल्याचे पाहायला मिळत आहे. आता कोर्टाने नेमका काय निर्णय घेतला? जाणून घ्या..

अशोक खरातभोवती सर्वात मोठा फास, आता ईडीकडे...अखेर कोर्टाने तो निर्णय घेतलाच!
Ashok-KharatImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 19, 2026 | 2:55 PM
Share

नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशोक खरातने दैवी शक्तीच्या असल्याच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार करुन त्यांची फसवणूक केली. तसेच खरातचे कोट्यवधी रुपयांची देखील फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आता कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंग (पैशांची बेकायदेशीर विल्हेवाट)चा संशय असल्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाला (ED) अखेर अशोक खरातला अटक करण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे. नाशिकवरून थेट मुंबईतील विशेष पीएमएलए (PMLA) सत्र न्यायालयात त्याला हजर करण्यात आले होते. न्यायालयाच्या परवानगीनंतर आता ‘ईडी’ खरातला अटक करणार असून, अधिकृत रिमांडसाठी उद्या (बुधवारी) सकाळी साडेअकरा वाजता पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातविरोधात एक प्रेडिकेट गुन्हा (मूळ गुन्हा) दाखल करण्यात आला होता. राजेंद्र जासूद यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या मूळ गुन्ह्याच्या आधारावरच ‘ईडी’ने खरातविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अशोक खरातवर अत्यंत गंभीर आरोप आहेत:

पूजा-अर्चेच्या नावाखाली लुटले: राजेंद्र जासूद यांच्याकडून पूजा-अर्चा करण्याच्या बहाण्याने खरातने करोडो रुपये उकळल्याचा प्राथमिक आरोप आहे.

फर्निचरसाठीही पैसे लाटले: केवळ रोकडच नाही, तर स्वतःच्या फार्महाऊससाठी लागणारे महागडे फर्निचरही खरातने जासूद यांच्याच पैशांमधून मागवले होते, असाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

६९ बँक खाती आणि करोडोंचे संशयास्पद व्यवहार

न्यायालयात ईडीच्या वकिलांनी अशोक खरातच्या बँक व्यवहारांची धक्कादायक माहिती सादर केली. तपास यंत्रणेच्या युक्तिवादानुसार, खरातने वेगवेगळ्या लोकांकडून कागदपत्रे गोळा करून तब्बल ६९ बँक खाती उघडली होती. या ६९ खात्यांपैकी जवळपास ६० बँक खाती अशोक खरात स्वतः ऑपरेट (हाताळत) करत होता. या सर्व खात्यांमधून करोडो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत. खरातचे ‘राहता बँक’ आणि ‘समता नागरी सहकारी बँक’ या पतसंस्थांमध्येही खाती असल्याचे समोर आले आहे. केवळ जासूदच नाही, तर ‘पोफळे’ नावाच्या व्यक्तीकडूनही करोडो रुपये अशोक खरात नॉमिनी असलेल्या पतसंस्थेच्या खात्यात जमा झाल्याचे व्यवहार ईडीला आढळून आले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता, या प्रकरणात खूप मोठ्या प्रमाणावर मनी लाँड्रिंग झाल्याचा प्रबळ संशय ईडीच्या वकिलांनी कोर्टात व्यक्त केला.

उद्या मिळणार ईडी कोठडी?

अशोक खरातला नाशिकवरून थेट मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयात आणण्यात आले होते. ईडीने खरातच्या अटकेची परवानगी मागितली असता, न्यायालयाने ती मंजूर केली आहे. आता खरातला अटक करून अधिक चौकशीसाठी त्याची ‘ईडी कोठडी’ (ED Custody) मिळवण्याच्या उद्देशाने तपास यंत्रणा उद्या पुन्हा न्यायालयात हजर राहील. कोर्टाने खरातला उद्या सकाळी ११:३० वाजता रिमांडसाठी कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या सखोल तपासानंतर आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे आणि हा पैसा कुठे कुठे वळवला गेला, याचे मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?