‘फडणवीसांना जेलमध्ये टाकायचं होतं, भाजपचे 20-25 आमदार फोडायचे होते’, मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

"भाजप नेते गिरीश महाजन यांना मोक्का लावलाच होता. त्यांचं प्लॅनिंग काय होतं बघा. या अशा लोकांना अटक करायची. जेलमध्ये टाकायचं. भाजप बॅकफूटवर जाईल आणि 20 ते 25 भाजपचे आमदार फोडायचे आणि महाविकास आघाडीत घ्यायचे", असा मोठा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

'फडणवीसांना जेलमध्ये टाकायचं होतं, भाजपचे 20-25 आमदार फोडायचे होते', मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 8:21 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीबद्दल सर्वात मोठा दावा केला आहे. “महाविकास आघाडी सरकारमध्ये भाजपच्या 5 लोकांना जेलमध्ये टाकणार होते”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. “पाचवा नंबर हा देवेंद्र फडणवीस यांचा होता”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. “त्यांना भाजपचे 20 ते 25 आमदार फोडायचे होते”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. “त्यांनी सांगितलं की चौकशी लावा. आता मी बोललो ते काही ऐकत नाही. आता त्यांचं सरकारच पलटी करुन टाकलं. नाहीतर भाजपच्या 5 लोकांना जेलमध्ये टाकलं असतं. पाचवा नंबर देवेंद्र फडणवीस यांचा होता. सर्व माझ्याकडे आले, मला म्हणाले ते, म्हटलं मी काय सोडत नाही. मी म्हटलं, विचार करुन करा. कारण दोन लोकं वरती बसलेले आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“भाजप नेते गिरीश महाजन यांना मोक्का लावलाच होता. त्यांचं प्लॅनिंग काय होतं बघा. या अशा लोकांना अटक करायची. जेलमध्ये टाकायचं. भाजप बॅकफूटवर जाईल आणि 20 ते 25 भाजपचे आमदार फोडायचे आणि महाविकास आघाडीत घ्यायचे. महाविकास आघाडी मजबूत करायची, असं प्लॅनिंग होतं. आता बोललो, काठावर एकदम आले आहेत. आता थांबलो तर यांचा गेम होऊन जाईल आणि आपला राहून जाईल. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम वाजवून टाकला”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘लखनौमध्ये जमीन, श्रीधर पाटणकर पार्टनर’

“मुख्यमंत्री पदासाठी यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लाऊन मत मागितले. मी त्यांना 5 वेळा समजावलं होतं, पण सर्व प्री प्लॅन होतं. ते म्हणाले की किरीट सोमय्या, नारायण राणे यांना पार्टीतून काढणार का? चोऱ्या चपाट्या केल्या आहेत तर त्याबाबत ते लोकं बाहेर काढणारच ना? ते काढतात. ते मोठं काम आहे. नंदकिशोर चतुर्वेदी सीए आहे. लखनौला 200 एकर जागा अटॅच केली आहे. या हमसफर कंपनीमध्ये पार्टनर कोण कोण आहेत? तर श्रीधर पाटणकर आहेत. पुढची नावे मी सांगत नाही. कारण सगळं एकदम सांगून चालत नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“धनुष्यबाण आम्हाला मिळाला. पक्ष मिळाला. यानंतर त्यांनी बँक खात्यातील पैसे आमच्याकडे मागितले. आम्ही म्हटलं देऊन टाकू. त्यांना फक्त पैसे पाहिजे. कंटेनर भरून कुठे लंडनला आहेत. हे सर्व पैसे किरीट सोमय्या यांनी माहिती आहे. ही लोकसभा जाऊद्या. मी त्यांना सांगितलं आहे की करू त्यांचं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“हे म्हणतात की मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेती करायला जातो. मी जर तुमच्यासारखे ८ तास गाडी चालवत गेलो तर कसं होईल? मी ८ तासात ८ हजार फाईल सह्या करतो. उद्योगपतींच्या घराखाली जिलेटीन कांड्या ठेवतात, कसे उद्योग राहतील? मी तर सर्वांना तंबी दिलीय. हॉस्पिटलमध्ये सर्व कॅशलेस केलं आहे. मुलुंड, भांडूप, घाटकोपर हा आपला बालेकिल्ला आहे. इथे दुसऱ्याला घुसू द्यायचे नाही”, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं.

Non Stop LIVE Update
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.