AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाला मोठा धक्का; मुंबई महापालिकेत गेम फिरला अन् आमदारपुत्राची पडली विकेट

मुंबई महापालिकेत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेत गेम फिरल्याने आमदारपुत्राची विकेट पडली.

शिंदे गटाला मोठा धक्का; मुंबई महापालिकेत गेम फिरला अन् आमदारपुत्राची पडली विकेट
eknath shinde groupImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 23, 2026 | 8:19 AM
Share

मुंबईत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. खरंतर शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागातील अशासकीय सदस्य निवडणुकीत दिलीप लांडे यांच्या मुलाला पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. एल प्रभाग समितीवरील अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या निवडीला महायुतीतील भाजपचाही विरोध पाहायला मिळाला. यामुळे मुंबई महापालिकेच्या एल प्रभाग समितीवरील अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

पालिकेच्या एल विभागातील निवड प्रक्रियेला शिवसेनेच्या दोन सदस्यांसह भाजपच्या नगरसेवकांनीही विरोध केला.  या मतदानात आमदार दिलीप मामा लांडे यांचा मुलगा प्रणव लांडे याच्यासह आणखी दोन जणांचा पराभव झाला आहे. एल प्रभाग समितीवर अशासकीय आणि संस्थांच्या सदस्यांच्या नामनिर्देशनासाठी एकूण १७ अर्ज प्राप्त झाले होते.

त्यापैकी १४ अर्जांमध्ये त्रुटी असल्याची माहिती समोर आलीय. मतदानात ११ सदस्यांनी सहभाग घेतला होता.  त्यापैकी ९ जणांनी विरोधात मतदान केलं तर २ जणांनी बाजूने मतदान केले. शिवसेनेचे किरण लांडगे , मीनल तुरडे यांनी या निवड प्रक्रियेला विरोध केलाय. तर शिवसेनेच्या दोन सदस्यांनी विरोधात मतदान केल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत.  त्यातच भाजपचे हरीश भांदिर्गे यांनीही विरोधाची भूमिका घेतल्याने महायुतीमधील मतभेदही उघड झालेत.  प्रणव लांडे यांच्यासह आणखी दोन जणांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे एल प्रभाग समितीतील ही निवड प्रक्रिया राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई महापालिकेत 26 प्रभाग आहेत. त्यातील एल वॉर्ड प्रभागातील समितीत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तीन नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या पदासाठी 8 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर 17 अर्ज एल वॉर्डला मिळाले होते. या अर्जांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर आमदार दिलीप लांडे यांचे पुत्र प्रणव लांडे याच्यासह तिघेच पात्र ठरले होते. या तिघांच्या नियुक्तीचा प्रस्ताव देखील एल वॉर्ड प्रभाग समितीच्या बैठकीत मंजूरीसाठी मांडण्यात आला होता. परंतु समितीमधील काही सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी करण्यात आली.  प्रभाग समितीचे अध्यक्ष सेनेचे विजेंद्र शिंदे यांनी मतदानाचा निर्णय घेतला. खरंतर बैठकीत 13 सदस्यांपैकी 9 सदस्यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. तर फक्त दोघांनी प्रस्तावाच्या बाजूने कौल दिला. तर दोघे जण तटस्थ राहिले. त्यामुळे आमदारपुत्रासहित दोघांची नियुक्ती प्रक्रिया थांबली.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ