AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत एकनाथ शिंदे यांना पुन्हा डावलले, नवीमुंबईतील शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिना निमित्ताने नवी मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलल्याने ते नाराज असल्याचे म्हटले जात आहेत.

महायुतीत एकनाथ शिंदे यांना पुन्हा डावलले, नवीमुंबईतील शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही
Devendra Fadnavis and Eknath Shinde
| Updated on: Jun 06, 2026 | 10:54 PM
Share

राज्यात सत्तांतर घडवण्यात महत्वाचे ठरलेल्या आणि भाजपाला सत्तेचे सोपान देण्यात हुकमी एक्का ठरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वजन आता महायुती कमी झाल्याचे वारंवार दिसून येत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने नवीमुंबईत विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्या त्या सोहळ्या एकनाथ शिंदे यांना निमंत्रण न दिल्याचे उघडकीस आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाची माहिती दिलीच नसल्याचे उघडकीस आले आहे.

नवी मुंबई येथील नव्या विमानतळावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची माहिती एकनाथ शिंदे यांना दिली गेली नाही असे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांना या सोहळ्यात जाणीवपूर्वक डावल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

विधान परिषद निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्त उमेदवार मिळावेत यासाठी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन भाजपाचे नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस आपल्याला दाद देत नाहीत अशी तक्रार दिल्लीला जाऊन एकनाथ शिंदे वारंवार करत आहेत. त्यामुळे उभय नेत्यांमध्ये सौहार्दाचे संबंध आता राहिलेले नाहीत.

शतप्रतिशत भाजपा

मुंबई महानगर पालिका जिंकल्यानंतर आता भाजपाला साल २०२९ च्या लोकसभा निवडणूक शतप्रतिशत भाजपा अशा लढवायच्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी महायुतीत राहून आपल्या पक्षांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मराठवाड्यात आपले पूत्र श्रीकांत शिंदे यांना पाठवून पक्षाचा विस्तार करण्याची हालचाली सुरु केल्या आहेत .त्यातच आता अनेक वेळा महायुतीत त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Follow Us
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार