AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीच्या हत्येबद्दल बापलेकाला अटक आणि 20 दिवसांनी मुलगी स्वत: पोलिसांकडे हजर, अजब प्रकाराने पोलीस चक्रावले !

बुलढाण्यात एक अजब घटना घडली आहे. मध्य प्रदेशात राहाणाऱ्या एका तरुणीची हत्या करुन तिला जाळून तिचा मृतदेह नष्ट केल्याच्या आरोपावरुन जळगावातील जामोद पोलिसांनी तरुणीच्या वडीलांना आणि भावाला अटक केली. मात्र, ही तरुणी आता जीवंत असल्याने खळबळ उडाली आहे.

मुलीच्या हत्येबद्दल बापलेकाला अटक आणि 20 दिवसांनी मुलगी स्वत: पोलिसांकडे हजर, अजब प्रकाराने पोलीस चक्रावले !
Police Baffled by Bizarre Case in Buldhana
| Updated on: May 28, 2026 | 5:18 PM
Share

२० दिवसापूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. मृतदेहापासून काही फुटावर महिलेचे शिरही आढळलं होतं.या प्रकरणी तात्काळ माहिती मिळाल्यावर जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि फॉरेन्सिक विभागाची टीम बोलावून या सर्व प्रकरणाचा तपास केला. विशेष म्हणजे अप्पर पोलीस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी या प्रकरणात मार्गदर्शन करून या प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा केला होता.या मुलीच्या हत्येच्या प्रकरणात बापलेकांना पोलिसांनी अटकही केली. मात्र, २० दिवसांनी मुलगी स्वत: पोलिसाकडे हजर झाली. आता अर्धवट जळालेला मृतदेह कोणत्या महिलेचा असा सवाल निर्माण झाला आहे.

बुलढाणा पोलिसांचा निष्काळजीपणाचा एक अजब नमुना समोर आला आहे. मध्य प्रदेशातील एका गावातील शिवानी बापूराव कळमेकर हिचा अनैतिक संबंधातून खून करण्यात आला होता. शिवानी हीचे तिच्या प्रियकराशी अनैतिक संबंध होते.आणि ती विवाहित असून देखील प्रियकराला भेटत असल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप होता. शिवानी हिची हत्या करुन तिचा मृतदेह महाराष्ट्रातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा धरणात जवळ आणून टाकला होता.अशी उकल जळगावच्या जामोद पोलिसांनी केली होती.

शिवानी कळमेकर जीवंत

याप्रकरणी मुलीची हत्या केल्याचा आरोप ठेवत बुलढाणा पोलिसांनी शिवानी कळमेकर हीचे वडील बापूराव कळमेकर तसेच तिच्या भावाला अटक केली. हे बापलेक आता दोघेही जेलमध्ये आहे. मात्र शिवानी कळमेकर जीवंत असून तिने आज तिच्या प्रियकरासोबत आज बुऱ्हानपूर पोलीस स्टेशन गाठत थेट आपण जीवंत असून माझ्या हत्याच्या गुन्ह्यात माझ्या वडिलांना आणि भावाला जळगाव जामोद पोलिसांनी जेलमध्ये ठेवले असल्याचा कबुली जबाब दिला असल्याच्या माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

जामोद पोलिसांचा मोठा निष्काळजीपणा ?

काही वेळापूर्वीच शिवानी कळमेकर ही जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली असून स्थानिक जळगाव जामोद पोलीस तिचा जबाब घेत आहेत. मात्र बुलढाणा पोलिसांनी जळगाव जामोद येथे सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए तपासणी न करता शिवानी कळमेकर हिच्या वडिल आणि भावावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रकरणात बुलढाणा आणि जळगाव जामोद पोलिसांचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. मात्र ज्या महिलेचा मृतदेह सापडला होता, ती नेमकी कोण ? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. तर बुलढाणा पोलीस या घटनेबद्दल बोलायला सध्या तरी तयार नाहीत अशी स्थिती आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा