AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची बदली झाली? मुंढे यांनीच समोर येत…2 ओळींच्या संदेशात नेमकं काय?

तुकाराम मुंढे यांच्यावर एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवताच त्यांची एफडीए आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे, असे म्हटले जात होते. परंतु आता तुकाराम मुंढे यांनीच त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून स्पष्टीकरण दिलंय.

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची बदली झाली? मुंढे यांनीच समोर येत...2 ओळींच्या संदेशात नेमकं काय?
tukaram mundhe transferImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2026 | 1:26 AM
Share

Tukaram Mundhe Transfer : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे धडाडीचे आणि कर्तव्यकठोर असे अधिकारी मानले जातात. भ्रष्टाचार, कर्तव्यात  कुचराई करणाऱ्यांचा मुंढे यांना टोकाचा तिटकारा आहे. त्यांच्या याच रोखठोक स्वभावामुळे आणि कार्यशैलीमुळे आतापर्यंत अनेकदा त्यांची बदली झालेली आहे.  सध्या ते राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ही कारकीर्द चांगलीच गाजत आहे. खाद्यपदार्थांमधील भेसळ, निकृष्ट अन्नाविरोधात त्यांनी मोहीम उघडल्याने फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशात, परदेशातही त्यांच्या कार्याची वाहवा होतेय. आता राज्य सरकारने नुकतेच त्यांच्यावर एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे. एमपीएससीच्या परीक्षांत झालेल्या फेरफुटीच्या मुळाशी ते जाणार आहेत. दरम्यान, एकीकडे ही महत्त्वाची जबाबदारी मिळालेली असतानाच दुसरीकडे त्यांची एफडीए विभागातून बदली झाली असल्याचा दावा केला जात होता. तशा चर्चाही रंगल्या होत्या. याच बदलीच्या चर्चेवर खुद्द तुकाराम मुंढे यांनीच भाष्य केलंय.

मुंढे यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

तुकाराम मुंढे यांना एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदाची जबाबदारी मिळताच त्यांची एफडीए आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे, असे म्हटले जात होते. परंतु आता तुकाराम मुंढे यांनीच त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून या चर्चेला पूर्णविराम दिलाय. माझी कुठेही बदली झालेली नाही. मी अजूनही एफडीएचा आयुक्त असून अन्नपदार्थांच्या भेसळीविरोधातील मोहीम चालूच राहील, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलंय.

तुकाराम मुंढे आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले?

“नाही, माझी FDA मधून बदली झालेली नाही. मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे,”  असं तुकाराम मुंढे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये सांगितलंय. सोबतच त्यांनी ट्रस्ट हा हॅशटॅक आवर्जून जोडला आहे.

तुकाराम मुंढे पेपरफुटी प्रकरणाचा गुंता सोडवणार का?

दरम्यान, पुण्यात गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. अनेक परीक्षांत पेपरफुटी झालेली आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांची होती. तसेच या प्रकरणाची चौकशी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्याच्या हातून व्हावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली. एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीत तुकाराम मुंढे यांचा समावेश करण्यात आला असून त्यांच्यावर चौकसी समितीच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली.  मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारतर्फे आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. आमदार रोहीत पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मुंढे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान