महिला सफाई कामगाराला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण

लातूर : ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगाराला ग्रामपंचायतीत डांबून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना लातूरच्या शिवनखेड येथे घटली आहे. पीडित सफाई कामगार महिलेने तिचा झाडू आणि टोपल्याचं नुकसान कुणी केलं असं विचारलं, यावरुन ग्रामपंचायतीत उपस्थित असलेल्या तिघांनी या महिलेला मारहाण करून रक्तबंबाळ केलं. गेल्या तीन दिवसांपासून या महिलेवर लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अहमदपूर तालुक्यातल्या शिवनखेड …

महिला सफाई कामगाराला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण

लातूर : ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगाराला ग्रामपंचायतीत डांबून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना लातूरच्या शिवनखेड येथे घटली आहे. पीडित सफाई कामगार महिलेने तिचा झाडू आणि टोपल्याचं नुकसान कुणी केलं असं विचारलं, यावरुन ग्रामपंचायतीत उपस्थित असलेल्या तिघांनी या महिलेला मारहाण करून रक्तबंबाळ केलं. गेल्या तीन दिवसांपासून या महिलेवर लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अहमदपूर तालुक्यातल्या शिवनखेड इथल्या ग्रामपंचायतीत राजाबाई सोनकांबळे या गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. त्यासाठी लागणारे रस्ते-नाले साफ करण्याचं साहित्य त्या ग्रामपंचायतीतच ठेवतात. मात्र, कुणीतरी जाणून-बुजून त्यांचा झाडू आणि टोपले मोडून टाकले. त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीत आलेल्या आणि त्यांच्याच गावातील असलेल्या गोट्या ठाकूर, अजित ठाकूर यांना जाब विचारला आहे. यावर चिडलेल्या गोट्या ठाकूर आणि इतर दोघांनी या महिलेला आम्हाला जाब विचारते का म्हणत, ग्रामपंचायतीचा दरवाजा आतून बंद करून लाठ्या-काठ्या आणि लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. यात राजाबाई गंभीर जखमी झाल्या.

राजाबाई यांना एकच मुलगा आहे. तोही रोजगारासाठी शहरात गेलेला आहे. त्यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं. त्यामुळे त्या रस्ते झाडून आणि नाले साफ करून मिळालेल्या पैश्यात उदरनिर्वाह करतात.

मारहाणीचा हा प्रकार घडत असताना कुणीही त्यांच्या मदतीला आलं नाही. पोलिसांनी आता घटनेची दखल घेत मारहाण आणि अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *