AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात प्रदीप पुर्णेकर यांची हत्या, मुंबईत टागयर श्रॉफवर गोळीबार, संजय राऊत यांनी सरकारला घेरले…

ठाण्यात शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची हत्या,त्यानंतर जुहूत अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर कारवर गोळीबार झाल्याने संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका.

ठाण्यात प्रदीप पुर्णेकर यांची हत्या, मुंबईत टागयर श्रॉफवर गोळीबार, संजय राऊत यांनी सरकारला घेरले...
sanjay raut and devendra fadnavis
| Updated on: Oct 19, 2026 | 12:04 AM
Share

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर यांची हत्या, मुंबईत बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर गोळीबार या घटनांनी कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे कोसळून पडली आहे. आता राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय राहिला आहे. देवेंद्र फडणवीस हे सगळ्यात अपयशी गृहमंत्री ठरत आहेत अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे नेते प्रदीप पुर्णेकर यांची हत्या झाली होती. या हत्येपाठोपाठ रविवारी जुहू येथे एका कार्यक्रमावरुन घरी परतत असताना अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर गोळीबार करण्यत आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जोरदार ठीका केली आहे.

संजय राऊत यांनी काय पोस्ट केली

ठाण्यात पूर्णेकर हत्या;

मुंबईत टाइगर श्रॉफ वर गोळीबार!

कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण कोसळून पडली आहे!

राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय आहे!

देवेंद्र फडणवीस हे सगळ्यात अपयशी गृहमंत्री ठरत आहेत!

टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्याकारवर रविवारी सायंकाळी सात वाजता जुहूत गोळीबार झाला. जुहू्च्या पुष्पापार्क येथे फुटबॉल मॅच खेळून टायगर श्रॉफ कारने घरी जात असताना. त्यावेळी लोक त्याची छबी टिपण्याचा प्रयत्न करत असताना टायगर श्रॉफच्या कारवर मोटार सायकलवरुन आलेल्या तिघा अज्ञातांनी हा गोळीबार केला. त्यात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावले तर त्याचा चालक आणि रस्त्यावर रिक्षा चालक जखमी झाला आहे.  या घटनेनंतर पोलिसांनी १५ पथके स्थापन केली आहे. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,