तुळजापूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, पाच भाविकांचा जागीच मृत्यू
पंढरपूर-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी फाटा परिसरातील अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रस्ता रोको केला.

तुळजापूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या माजलगाव येथील चार चाकी वाहनाचा आणि एसटीशी धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी फाटा परिसरातील खामगाव–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. या अपघातानंतर रस्ता दुरुस्तीची मागणी करीत नागरिकांनी रास्ता-रोको आंदोलन केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून खड्ड्यात आदळल्याने चारचाकी वाहन अनियंत्रित झाले आणि हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.
तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या पाच जणांवर काळाने घाला घातला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी फाटा परिसरात खामगाव–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर एका चार चाकी वाहनाचा आणि एसटी बसशी धडक होऊन भीषण अपघात. या घटनेनंतर नागरिकांनी रास्ता रोको करीत संतप्त निदर्शने केली.
तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या माजलगाव येथील चारचाकी वाहनाचा एसटी बसला धडकून मोठा अपघात झाला. या घटनेनंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. तर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असुन खड्ड्यात आदळल्याने चारचाकी गाडी अनियंत्रित झाली आणि अपघात झाला. रस्त्याबाबत खासदार बजरंग सोनवणेंनी तक्रार केल्यानंतर काही दिवसांपूर्वी केंद्रीय पथकाकडून पाहणी आणि कामाचा दर्जा तपासण्यात आलेला होता. हा रस्ता खराब असल्याने दररोज अपघात वाढ होत आहेत.
येथे पोस्ट वाचा –
VIDEO | Maharashtra: Five people were killed and one was critically injured in a head-on collision between a state transport bus and a car near Shindewadi Phata in Majalgaon area of Beed district.
The accident occurred on the Khamgaon-Pandharpur National Highway as the occupants were travelling to Tuljapur for darshan.
(Full video available on PTI Videos – https://t.co/bIyFWTfmBd)
— Press Trust of India (@PTI_News) October 18, 2026
मृतांची माहिती –
1. ओमकार महादेव गिरी ( वय 25, वर्षे. रा. माजलगाव)
2. अनिल शेप ( वय 30 वर्षे, रा. माजलगाव)
3. समर्थ उर्फ माऊली गजानन नामदास ( वय 12 वर्षे, रा. मंजरथ ता. माजलगाव)
4. ऋतिक मोतीलाल बडे ( वय 18 वर्षे, रा. फुलेनगर, माजलगाव)
5. गजानन महादेव नामदास (वय 36 वर्षे ,रा. मंजरथ ता. माजलगाव)
वणीत कारच्या धडकेत एक पोलीस निरीक्षक ठार
कळवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असताना भाविकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांच्या अंगावर कार घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या या भीषण अपघातात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून, तीन पोलिसांसह सहा भाविक जखमी झाले आहेत. भरधाव कार चालवणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
