AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Subodh Sawaji : ‘महिला स्वतःहून निरनिराळ्या प्रकारे बलात्कार करवून घेतात अशा महिलांना..’ माजी मंत्री सुबोध सावजी यांचं वादग्रस्त वक्तव्य

Subodh Sawaji : "मात्र ज्या महिलांनी स्वार्थाकरीता, पैसे कमविण्याकरीता बलात्कार करुवून घेतले अशा व्यभिचारी महिला समाजाला कलंक आहेत. अशा महिलांना समाजासमोर आणावे हे माझे तसेच राज्यातील जनतेचे स्पष्ट मत आहे"

Subodh Sawaji : 'महिला स्वतःहून निरनिराळ्या प्रकारे बलात्कार करवून घेतात अशा महिलांना..' माजी मंत्री सुबोध सावजी यांचं वादग्रस्त वक्तव्य
Subodh Sawaji
| Updated on: Apr 16, 2026 | 3:08 PM
Share

राज्य सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलेल्या एका व्यक्तीने महिलांबद्दल अत्यंत निंदनीय, वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “स्वतःहून बलात्कार करुन घेणाऱ्या महिलांवर पोलीस केसेस दाखल करुन, त्यांची नावं, फोटो असल्यास व्हिडीओ चित्रीकरण शासनाने समाजासमोर आणावे” असं वादग्रस्त विधान माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केलं आहे. त्यांनी राज्यपालांना पत्र पाठवलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सावजी यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “बलात्कार दोन प्रकारचे आहेत. एक जबरदस्ती केलेला बलात्कार. दुसरा महिलेने स्वतःहून करवून घेतलेला बलात्कार. जबरदस्ती केलेला बलात्कार यामध्ये महिलांची नावं गुप्तच राहिली पाहिजेत. हे समाजाकरीता चांगलं आहे” असं सुबोध सावजी यांनी म्हटलं आहे.

“मात्र ज्या महिलांनी स्वार्थाकरीता, पैसे कमविण्याकरीता बलात्कार करुवून घेतले अशा व्यभिचारी महिला समाजाला कलंक आहेत. अशा महिलांना समाजासमोर आणावे हे माझे तसेच राज्यातील जनतेचे स्पष्ट मत आहे. अशा महिला जनतेसमोर उघड झाल्यास इतर महिला अशा वागणार नाहीत. स्वार्थाकरीता, पैशाकरीता बलात्कार करवून घेण्याचे प्रकार कमी होतील” असं सुबोध सावजी म्हणाले.

‘महिला स्वतःहून निरनिराळ्या प्रकारे बलात्कार करवून घेतात’

“भोंदू बाबा, संत, महात्मे, महाठग, आर्थिक लाभाच्या नादी लागून अनेक महिला निरनिराळया ठिकाणी जावून बलात्कार करवून घेतात, या बलात्कारीत महिलांची नावे जाहिर करावयाची नाहीत असा शासन निर्णय आहे. मात्र व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. त्यामुळे राज्यातील जनतेसह आपणास अशी विनंती आहे की, ज्या महिला स्वतःहून निरनिराळ्या प्रकारे बलात्कार करवून घेतात यांची नावे, फोटो असल्यास व्हिडीओ चित्रीकरण हे सर्व शासनाने जाहीर करावे” असं सुबोध सावजी म्हणाले.

आपण या बाबत शासनास निर्देशीत करावे, असेही राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. आता माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या या विधानाने कोणते वादळ उठते, ते लवकरच समजेल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...