Rahul Bondre : ऐनवेळी भाजप प्रवेशाचा निर्णय फिरवणारे काँग्रेस नेते राहुल बोंद्रेंनी राहुल गांधींना काय शब्द दिला?

Rahul Bondre : महाराष्ट्रात काँग्रेसला अजून एक धक्का बसणार होता. पण राहुल गांधींनी तो रोखला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट त्या आमदाराला फोन करुन त्याच्याशी चर्चा केली. त्यामुळे ऐनवेळी त्या आमदाराचं बंड शमलं.

Rahul Bondre : ऐनवेळी भाजप प्रवेशाचा निर्णय फिरवणारे काँग्रेस नेते राहुल बोंद्रेंनी राहुल गांधींना काय शब्द दिला?
Rahul Gandhi-Rahul Bondre
| Updated on: Sep 22, 2026 | 3:03 PM

काँग्रेसला त्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच मोठा धक्का बसणार होता. बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे भाजपात प्रवेश करणार होते. त्यांनी फेसबुक लाइव्हद्वारे भाजपात प्रवेश करण्याचा निर्णयही जाहीर केला होता. पण राहुल बोंद्रे यांनी अचानक ऐनवेळी निर्णय बदलला. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राहुल ब्रोंद्रे यांना फोन केला. त्यांची समजूत काढली. त्यानंतर राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. राहुल बोंद्रे यांना जनाधार आहे. बुलढाण्यात त्यांच्या भाजपं प्रवेशाने काँग्रेसला धक्का बसला असता. राहुल बोंद्रे यांच्या काँग्रेसमध्येच थांबण्याच्या निर्णयावर यशोमती ठाकूर बोलल्या आहेत.

“राहुल गांधी कार्यकर्त्यांची काळजी घेणारा नेता आहे. राहुल बोंद्रे यांच्यावर किती प्रेशर दबाव असेल त्यांच्या चेहऱ्यावरून कळतं आपल्याला. राहुल बोंद्रे यांच्या संस्था बरबाद करण्यासाठी आत्ताचं सरकार निघालं आहे” असा यशोमती ठाकूर यांनी आरोप केला. “काँग्रेसने असं खुनशी राजकारण कधीच केलं नाही. ही वैचारिक लढाई आहे. राहुल बोंद्रे म्हणाले मला कितीही त्रास झाला तरी काँग्रेस सोबत आहे असं आश्वासन राहुल गांधींना दिलं. राहुल गांधी कठीण काळामध्ये आमच्यासोबत आहे. उद्याचा काळ काँग्रेसचा असेल” असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

राहुल गांधींनी त्यांची कशी समजूत काढली?

राहुल बोंद्रे चिखली विधानसभेचे माजी आमदार आहेत. सध्या या ठिकाणहून भाजपच्या श्वेता महाले आमदार आहेत. राहुल गांधी यांनी राहुल बोंद्रे यांच्याशी बोलताना त्यांची समजूत काढली. “तुम्ही पक्षासाठी चांगले कार्य केले आहे, तुम्ही निष्ठावान आहात. तुमची पक्षाला गरज आहे. तुम्ही निर्णयाचा फेरविचार करा” अशा शब्दात राहुल गांधी यांनी त्यांची मनधरणी केली. राहुल गांधी यांच्या एका फोन कॉलने राहुल बोंद्रे यांना धीर मिळाला. “तुम्ही मला फोन केलात, माझी दखल घेतली. आता माझे सर्वकाही गमावले तरी मी काँग्रेस आणि तुमच्यासाठी काम करणार” असा त्यांनी शब्द दिला. सध्या कुठल्याही निवडणुका नसताना काँग्रेसचा माजी आमदार भाजपामध्ये प्रवेश करायला निघाला होता.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us