AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित दादांनी याला कुत्र्याची उपमा दिलेली, त्यामुळे आम्हाला…सुप्रिया सुळेंच्या विषयावरुन उमेश पाटलांवर सडकून टीका

"स्वतः अजित दादांनी याला कुत्र्याची उपमा दिली होती, त्यामुळे आम्हाला बोलायला लावू नका. मोहोळ मध्ये तुमचं काय काय आहे, त्याबद्दल तोंड उघडायला लावू नका. त्यामुळे मित्र म्हणून सल्ला देतो"

अजित दादांनी याला कुत्र्याची उपमा दिलेली, त्यामुळे आम्हाला...सुप्रिया सुळेंच्या विषयावरुन उमेश पाटलांवर सडकून टीका
umesh Patil
| Updated on: Aug 31, 2026 | 3:30 PM
Share

सोलापूरमधील मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे नेते उमेश पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर उमेश पाटील यांनी टीका केली होती. “उमेश पाटील यांनी स्वतःची राजकीय लायकी आणि राजकारणातली पातळी ओळखली पाहिजे. आपण कोणत्या नेत्याला प्रत्युत्तर देतो हे पाहिले पाहिजे. हा उमेश पाटील जिल्हा परिषदेची निवडणूक देखील जिंकू शकला नाही. राजकारणात क्रेडिबिलीटी नसलेला, पॉलिटिकल मॅच्युरिटी नसलेला आणि कॅमेराजीवी असा उमेश पाटील आहे” अशा शब्दात रमेश कदम यांनी उमेश पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

“स्वतः अजित दादांनी याला कुत्र्याची उपमा दिली होती, त्यामुळे आम्हाला बोलायला लावू नका. मोहोळ मध्ये तुमचं काय काय आहे, त्याबद्दल तोंड उघडायला लावू नका. त्यामुळे मित्र म्हणून सल्ला देतो. वैचारिक आणि राजकीय मतभेद असू शकतात. मात्र केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशी वक्तव्य करू नये. ज्या भाषेत तुम्ही टीका कराल त्या भाषेत आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही” असं रमेश कदम म्हणाले.

एवढा मोठा दु:खाचा डोंगर कोसळलेला

काही दिवसांपूर्वी उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींबद्दल मोठं भाष्य केलं होतं. “दादांच्या मृत्यूनंतर, अपघात झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी अंत्यविधी झाला. दादांना मृताग्नी देण्याआधी काही लोकांनी शपथविधीची तयारी चालू केलेली. हा मंत्री होणार, तो केंद्रात जाणार, कुठे आहे दु:ख. त्या परिवारावर एवढा मोठा दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांना आधार, सांत्वनाची गरज असताना राजकीय आडाखे बांधत होती काही लोकं” असा गौप्यस्फोट उमेश पाटील यांनी केला होता.

“उमेश पाटील कोणाच्या बापाला घाबरत नाही. उमेश पाटील अजितदादांचा कार्यकर्ता आहे. दादा जसे निडर होते, तसाच उमेश पाटील आहे. उलट दोन पावलं पुढे आहे” असं उमेश पाटील बोललेले.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?