AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकीकडे दुष्काळाची झळ, दुसरीकडे इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; कव्वाली कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल!

एकीकडे पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना, शिरूरमध्ये झालेल्या एका कव्वालीच्या कार्यक्रमातील नोटांच्या उधळणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एकीकडे दुष्काळाची झळ, दुसरीकडे इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; कव्वाली कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल!
imtiaz jaleel videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2026 | 8:16 PM
Share

 सुनील ठिगळे, टीव्ही 9 मराठी, पुणे : सध्या राज्यात भीषण दुष्काळ पडलाय. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या मार्गाने मदत केली जातेय. दुष्काळाचं सावट आल्याने त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रात होताना दिसतोय. त्यामुळेच राजकीय नेते काटकसरीने वागत आहेत. अनेक नेत्यांनी अवाजवी खर्च टाळून आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. तर काही नेत्यांनी शेतकऱ्यांना सढळ हातांनी मदत केलीय. दरम्यान एकीकडे पैसे वाचवून मदतीचा हात पुढे काल जात असताना आता दुसरीकडे मात्र माजी खासदार इम्तियाज जलील याच्यावर एका कार्यक्रमात नोटांची उधळण होत असल्याचे समोर आलेय. तसा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

एकीकडे पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना, शिरूरमध्ये झालेल्या एका कव्वालीच्या कार्यक्रमातील नोटांच्या उधळणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळण्यात आल्याचे दिसत आहे. या प्रकारावरून आता सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळण्यात आल्याचे दिसतेय

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. असे असताना शिरूरमधील एका कव्वालीच्या कार्यक्रमातील हा व्हिडिओ चर्चेत आलाय. या व्हिडिओमध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळण्यात आल्याचे दिसतेय. कार्यक्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे सार्वजनिक कार्यक्रमात अशा पद्धतीने पैशांची उधळण केली जात असल्याचे बोलले जातेय. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या अडचणी आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांमधील अशा खर्चाच्या प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असावा, यावर सोशल मीडियावर मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत.

Follow Us
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता