AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चालकाचे नियंत्रण सुटले, बस कठडा तोडून थेट…; गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

गडचिरोली-उमरखेड एसटी बसला नवेगाव मुरखळाजवळ भीषण अपघात झाला असून, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या दुर्घटनेत ७ महिन्यांच्या चिमुकल्यासह ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत.

चालकाचे नियंत्रण सुटले, बस कठडा तोडून थेट...; गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू
gadchiroli accident
| Updated on: May 21, 2026 | 2:11 PM
Share

गडचिरोलीवरून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडकडे निघालेल्या एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. गुरुवारी (२१ मे) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. चंद्रपूर मार्गावरील नवेगाव-मुरखळा परिसरातील एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर ती भरधाव बस लोखंडी कठडा तोडून रस्त्याच्या कडेला शेतात उलटली. या अत्यंत दुर्दैवी घटनेत ३ प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका ७ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. तर ३३ प्रवासी जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

गडचिरोली-उमरखेड ही एसटी बस नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ७ वाजता ५१ प्रवाशांना घेऊन गडचिरोलीवरून निघाली होती. ही बस ७.३० वाजेच्या सुमारास नवेगाव-मुरखळा गावाजवळील वळणावर आली असता, अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर ती बस रस्त्याच्या कडेला असलेला लोखंडी कठडा तोडून खाली घसरली. त्यानंतर ती शेतात उलटली. अपघात होताच बसमध्ये एकच गोंधळ आणि हाहा:कार उडाला.

स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून बचावकार्य

या अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही प्रवाशांना बसच्या खिडक्या फोडून बाहेर काढण्यात आले.  या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या बसमधील १० प्रवासी गंभीर जखमी झाले होते. तर २१ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. यानंतर किरकोळ जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

७ महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू

या भीषण अपघातात ३ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या मृतांमध्ये एका ७ महिन्यांच्या निष्पाप बाळाचाही समावेश आहे. ख्वाजा शाहबुद्दीन (६०), लक्ष्मीबाई दुरकीवार (५५) आणि शिवांश स्वप्नील नवघरे (७ महिने) अशी या तिघांची नावे आहेत. हा अपघात घडला त्यानंतर शिवांशची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. त्यामुळे डॉक्टरांचे पथक त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

जखमींवर उपचार सुरू; आमदारांची भेट

तसेच या अपघातातील सर्व जखमींना तात्काळ गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ७ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून जखमींच्या उपचारात कोणतीही कसर भासणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

अपघातातील जखमींची नावे

या अपघातात धनश्री ललित चांदेकर, आशिष संघपाल साखरकर, मायाबाई बाबुराव कांबळे, संगीता बाबुराव कांबळे, ज्योती अविनाश पाल, श्रीहरी खळकर, बेबीबाई खळकर, चैतन्य मेडीवर, तानिया मेडीवर, वैशाली माडेवार, रूपाली खणके, ललिता खणके, ऋषभ खडके, सचिन वाळके, जयश्री वरभे, सचिन वरदे, जयश्री खाणके, रत्नाकर राऊत, पार्थ राऊत, मंगला कळसकर, भूषण दुरकीवार, चालक रोहित देशमुख (रा. अकोला), वाहक संदीप प्रल्हाद पवार, विकी सुरेश शेंडे, तारा साबळे (सर्व रा. वणी, जि. यवतमाळ), श्वेता स्वप्नील नवघरे (रा. चामोर्शी), डॉ. गणेश जैन, सुमन कत्तलवार, व्यंकट ढगे, अश्विनी तोरपे आणि गौरव कुमरे यांच्यासह इतर प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गडचिरोली परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा