VIDEO | गुंड गजा मारणेला सातारा पोलिसांनी कसं पकडलं?, पाहा थरारक CCTV फुटेज

एखाद्या सिनेमातील दृश्य असावे अशा थररक पद्धतीने पोलिसांनी मारणेला ताब्यात घेतले. (gajanan marne satara police cctv footage)

VIDEO | गुंड गजा मारणेला सातारा पोलिसांनी कसं पकडलं?, पाहा थरारक CCTV  फुटेज
गजा मारणेला पोलिसांनी अशा प्रकारे जेरबंद केले.
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 9:51 PM

सातारा :  हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणेला (Gajanan Marne) साताऱ्यातील मेंढा पोलिसांनी 6 मार्च रोजी पकडले. एखाद्या सिनेमातील दृश्य असावे अशा थररक पद्धतीने पोलिसांनी मारणेला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मारणेच्या धावत्या कारसमोर आपली कार उभी करत पोलिसांनी मारणेला ताब्यात घेतले. गेल्या अनेक दिवसांपासून मारणे पोलिसांना गुंगारा देऊन बाहेर फिरत होता. गजा मारणेवर खून, मारामारी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. (Gajanan Marne Arrested by Satara Medha police cctv footage found)

सातारा पोलिसांनी गजा मारणेला अशा प्रकारे पकडले, पाहा रियल सीसीटीव्ही फुटेज

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तसेच उर्से टोल नाक्यावर गजा मारणे याने टोल न भरणे तसंच दहशत पसरवणे तसं वातावरण तयार करणे, असे गुन्हे मिरवणुकीनंतर गजा मारणेवर दाखल झाले होते.

त्यानंतर मागील कित्येक दिवसांपासून गजा मारणे पुणे पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. त्याने पुण्यातून पलायन करुन सातारा जिल्ह्यात प्रवेश केला होता. गेल्या अनेक दिवस पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून गजा मारणेला मेढा पोलिसांनी 6 मार्चरोजी अटक केली होती. त्याचाच व्हिडीओ समोर आला आहे.

इतर बातम्या :

जावळी-महाबळेश्वरात ‘क्रेटा’मधून हवा, फिल्मी स्टाईल पाठलाग करुन गजा मारणेला सातारा पोलिसांच्या बेड्या

VIDEO : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, पायाला दुखापत, कोलकाताच्या रुग्णालयात उपचार

(Gajanan Marne Arrested by Satara Medha police cctv footage found)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.