Ganesh Naik : मनमानी खपवून घेतली जाणार नाही, गणेश नाईक यांचा थेट शिंदेंच्या विश्वासू मंत्र्याला इशारा

Ganesh Naik : मंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे दोघे ठाणे जिल्ह्यातून येतात. दोघांमधील राजकीय मतभेद अनेकदा समोर आलेत. आता गणेश नाईक यांनी थेट शिंदेंच्या मंत्र्याला इशारा दिला आहे.

Ganesh Naik :  मनमानी खपवून घेतली जाणार नाही, गणेश नाईक यांचा थेट शिंदेंच्या विश्वासू मंत्र्याला इशारा
Eknath Shinde-Ganesh Naik
| Updated on: Oct 23, 2026 | 3:46 PM

पालघरमधील प्रास्तावित विमानतळानजीकच्या सहा गावांमधील एमआयडीसीच्या भूसंपादनाच्या मुद्द्यावरून पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी थेट उद्योगमंत्र्यांनाच आव्हान दिलं. एकनाथ शिंदे शिवसेनेचे उदय सामंत महाराष्ट्र सरकारमध्ये उद्योग मंत्री आहेत. “उद्योग मंत्र्यांनी आदेश काढले, मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विश्वासात घेतले जात नाही. मनमानी खपवून घेतली जाणार नाही” असं गणेश नाईक म्हणाले. “स्थानिकांचा विरोध आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता प्रकल्पांबाबत निर्णय घेतले जात असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारलं. भूसंपादन प्रक्रिया स्थगित करण्याचे निर्देश दिले” असं गणेश नाईक म्हणाले.

जिल्ह्यातील प्रकल्पांबाबत निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना विश्वासात घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यापुढे अशा प्रकारची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे, या मुद्द्यावरून पालकमंत्री गणेश नाईक यांनी थेट उद्योगमंत्र्यांनाच आव्हान दिल्याने पालघरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Loading...

हिताचं संरक्षण झालं पाहिजे

पालघर जिल्ह्यातील जनता दरबार कार्यक्रमात पालकमंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याशी संवाद साधताना, देशाचे मालक कोण? असा सवाल उपस्थित केला. त्यांनी मुकेश अंबानी आणि नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला. “अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री भारतात येऊन मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांची भेट घेतात, याचा दाखला देत या व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रभाव असल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र, सत्तेची केंद्र कितीही मोठी असली, तरी गोरगरीब जनतेचा सन्मान राखला गेला पाहिजे, त्यांच्या हक्कांचं आणि हिताचं संरक्षण झालं पाहिजे” असं मत गणेश नाईक यांनी व्यक्त केलं. तसेच गरीब जनतेच्या समस्या सोडवून त्यांना मदत करणं आणि त्यांच्याशी असलेले जुने मैत्रीसंबंध जपणं महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us