AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्गालगत गॅसलाईन फुटल्याने गोंधळ, दुर्गंधीने मोठी वाहतूक कोंडी, मुंबईच्या दिशेची वाहतूक बंद

समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना घटना घडली आहे.या परिसरातून जाणारी गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. खबरदारी म्हणून मुंबईच्या दिशेचे वाहतूक बंद करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गालगत गॅसलाईन फुटल्याने गोंधळ, दुर्गंधीने मोठी वाहतूक कोंडी, मुंबईच्या दिशेची वाहतूक बंद
samruddhi mahamarg file photos
| Updated on: Aug 29, 2026 | 10:26 PM
Share

समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगराच्या समृद्धी महामार्गालगत जाणारी गॅस पाईपलाईन लिक झाल्याने या परिसरात एकच घबराट पसरली आहे. या गॅस गळतीने महामार्गावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ट्रॅफीक जाम झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, लासूर हडस पिंपळगाव टोलनाक्यावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ४५१.२ येथे गॅस पाईपलाईन लिक झाल्याची घटना घडली आहे.घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, गॅस गळती थांबवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, गॅस गळतीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशातील सर्वात मोठा महामार्ग

मुंबई ते नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग हा ७०१ किलोमीटर लांबीचा असून देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे म्हणून ओळखला जातो.  हा महामार्ग सहा पदरी असून यामुळे मुंबई ते नागपूर प्रवास आता अवघ्या ८ तासांत पूर्ण होतो.या महामार्गावर वाहनांना कमाल १२० किमी प्रति तास वेगाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील १० प्रमुख जिल्ह्यांमधून आणि ३९० हून अधिक गावांमधून जातो.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट