AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटीलची सरकारकडे मोठी मागणी, म्हणाली त्याला…

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातने केलेल्या महिलांच्या शोषणावर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने सोलापूरमध्ये कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. अशा भोंदूगिरीवर कठोर कारवाई करण्याची मागणी तिने यावेळी केली.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटीलची सरकारकडे मोठी मागणी, म्हणाली त्याला...
ashok kharat gautami patil
| Updated on: Apr 06, 2026 | 8:24 AM
Share

नाशिकमध्ये अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि कोट्यवधींची माया जमवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. स्वतःला ‘कॅप्टन’ किंवा ‘अवतारी पुरुष’ म्हणवून घेणाऱ्या या भोंदूबाबाने अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि लोकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या भोंदू बाबा अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. तो पोलीस कोठडीत आहे. आता याप्रकरणी विविध स्तरावरुन प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सोलापूरच्या खंडोबाची वाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित असताना समाजातील भोंदूगिरीवर कडक शब्दात प्रतिक्रिया दिली.

सोलापूर जिल्ह्यातील खंडोबाची वाडी येथे श्री खंडोबा देवाच्या यात्रोत्सवानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमीच्या अदाकारीवर सोलापूरकर अक्षरशः फिदा झाले. या कार्यक्रमाला महिलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गौतमीने मंचावर एन्ट्री घेताच चाहत्यांनी जागेवरच उभे राहून डान्स करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे परिसरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला. या घटनेनंतर गौतमी पाटीलने टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी तिला भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी विचारणा करण्यात आली. त्यावर तिने स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली.

भोंदू बाबा अशोक खरातवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. योग्य ती कडक कारवाई झाली पाहिजे. याकडे जास्त गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. यांसारख्या गोष्टी आपल्या देशात परत या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. यामुळे आताच यावर कडक कारवाई व्हायला हवी, असेही भोंदू बाबा अशोक खरात यांनी म्हटले.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण काय?

स्वतःला कॅप्टन आणि अवतारी पुरुष म्हणवून घेणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातवर त्याच्यावर नाशिक आणि परिसरात अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. अशोक खरातवर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. धार्मिक विधीच्या नावाखाली अमली पदार्थ देऊन महिलांवर अत्याचार करणे आणि त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. कौटुंबिक अडचणी दूर करतो किंवा अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून त्याने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. विधी करण्याच्या बहाण्याने महिलांचे शारीरिक शोषण करणे आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळणे असे गंभीर प्रकार त्याने केल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी पोलिसांना अशोक खरातच्या कार्यालयात छापेमारी केली आहे. त्याचे अनेक बड्या नेत्यांशी संबंध आणि पुण्यासारख्या शहरात कोट्यवधींची मालमत्ता असल्याचेही तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत अशोक खरातला अटक केली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि फसवणुकीचे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे समाजात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. लोकांनी अशा कोणत्याही भोंदूगिरीला बळी पडू नये आणि संकटकाळात बाबा-बापूंकडे जाण्याऐवजी कायदेशीर किंवा वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Follow Us
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?