AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इच्छुकांचं टेन्शन वाढवणारी बातमी; महापालिका निवडणुकांमध्ये जागांची अदलाबदल होणार का? महायुतीमधून पहिली प्रतिक्रिया

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

इच्छुकांचं टेन्शन वाढवणारी बातमी; महापालिका निवडणुकांमध्ये जागांची अदलाबदल होणार का? महायुतीमधून पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 25, 2025 | 3:38 PM
Share

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं, त्यानंतर आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. मात्र या निवडणुका युती, आघाडी म्हणून लढवल्या जणार की? स्वबळाची परीक्षा होणार? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीसंदर्भात बोलताना आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन? 

जागावाटपाचा निकष अद्याप ठरलेला नाही. ज्या जागा पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या, ज्या सिटिंग जागा आमच्या आहेत, त्या जागा आमच्याच आहेत,  आणि हा विषय जर गुंतागुंतीचा होत असेल, तर त्यावर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. त्यावर मार्ग निघू शकतो. मात्र आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच या सर्व निवडणुका लढणार आहोत,  फार काही तोडगा निघाला नाही तर मैत्री पूर्ण लढत होऊ शकते, असं महाजन यांनी म्हटलं आहे.

खडसेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया  

मी भाजपात असताना गिरीश महाजन हे माझे सामान्य कार्यकर्ते होते, असं खडसे यांनी म्हटलं होतं, त्यावर देखील आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बरोबर आहे मी साधा कार्यकर्ताच आहे. लहानपणापासून मी संघाचा स्वयंसेवक आहे, खडसे साहेबांना म्हणा मी बाल स्वयंसेवक होतो,  मी भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो.  तालुक्याचा  त्यानंतर जिल्ह्याचा मग राज्याचा झालो. हे 1990 साली आले, मी शाळेत होतो, तेंव्हापासून शाखेत जात होतो. मी त्यांना कार्यकर्ता म्हणणार नाही,  त्यांना नेताच म्हणेल, असं महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे, यावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठेही नाराजी नाही. काल सर्वांची बैठक झाली. मीही त्या बैठकीला होतो. सर्व पक्षनेत्यांची बैठक झाली, कुठेही नाराजी नाही. काही कुरबुर थोडीफार असते. पक्षात पण असते आणि मित्र पक्षात पण असते. पण नाराजी माध्यमांमधून दिसते. आमच्यामध्ये एकमत आहे आणि एकमतानेच आम्ही पुढच्या सर्व निवडणुका लढवणार आहोत, असं महाजन यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?