AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul Election : गोकुळ दूध महासंघाच्या मतदानाला सुरुवात, मतदारांची लगबग वाढली, उद्या कोण गुलाल उधळणार?

Gokul : गोकुळ दूध महासंघाच्या मतदानाला सुरुवात झालीये. निवडणुकीमुळे मतदारांची लगबग वाढली आहे. या निवडणुकीकडे संंपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Gokul Election : गोकुळ दूध महासंघाच्या मतदानाला सुरुवात, मतदारांची लगबग वाढली, उद्या कोण गुलाल उधळणार?
Gokul milk union election Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 9:46 AM
Share

कोल्हापूरच्या गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. कोल्हापुरातील 12 तालुक्यातील 35 मतदान केंद्रावर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण 5 हजार 418 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत 25 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीमध्ये लढत होत आहे.  तर या निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होईल. त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उधळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

कोल्हापुरातील प्रत्येक तालुक्यातील 35 केंद्रावर मतदान सुरू झालं आहे. सकाळपासूनच निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. सहलीला गेलेले मतदार देखील केंद्रावर मतदानासाठी येणार आहेत. तर रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये या मतमोजणी पूर्ण होईल. सकाळी आठ वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी सुरुवातीच्या टप्प्यात उमेदवारांकडूनच मतदान उरकून घेण्यावर भर दिला जात आहे. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय.  महायुती आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीकडूनही मतदार, ठराव धारकांना एकत्रितच मतदान केंद्रावर आणलं जाणार आहे.  काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’साठी गगनबावडा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

मतदान केंद्रावर फोन घेऊन जाण्यास मज्जाव 

कोल्हापुरातील 35 केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात आलाय. तसेच मतपत्रिकेचा फोटो काढला. त्यानंतर मोबाईलवर व्हायरल केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी दिला आहे. गोकुळसाठी 35 केंद्रावर मतदानासाठी लगबग पाहायला मिळत आहे.  करवीर तालुक्यात स्वामी विवेकानंद कॉलेजच्या आवारातील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये पार पडत आहे.   यासाठी सर्व संबंधित मतदान केंद्र पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आलंय.

निवडणुकीसाठी दुसर्‍या दिवशी शपथ घेण्याचं सत्र 

गोकुळ दूध संघासाठी महायुतीकडून दुसऱ्या दिवशी देखील शपथा घेण्याचं सत्र सुरू आहे.  बाळूमामा मंदिर परिसरात ठरावधारकांना शपथ देण्याचं नियोजन आहे. शपथ देऊन ठराव धारकांना मतदानासाठी पाठवलं जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...