शरीरात सोन्याची पेस्ट, नागपूर विमानतळावर तस्करीचा खळबळजनक प्रकार

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 8:47 AM, 8 May 2019
शरीरात सोन्याची पेस्ट, नागपूर विमानतळावर तस्करीचा खळबळजनक प्रकार

नागपूर : शरीरात सोन्याच्या पेस्टद्वारे तस्करीचा प्रकार नागपुरात समोर आला आहे. नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. नागपूर विमानतळावर सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली.

नेमकं काय प्रकरण आहे?

नागपूर विमानतळावर सीमा शुल्क विभागाने दोन जणांवर कारवाई केली आहे. या दोघांनी शरीराच्या आत पेस्टच्या द्वारे सोन्याची तस्करी केली. या सोन्याची किंमत तब्बल 25 लाख रुपये इतकी आहे.

शरीराच्या आत पेस्ट रुपात दोन तरुणांनी एअर अरेबीयाच्या विमानातून सोनं आणलं होतं. सीमा शुल्क विभागाला संशय आल्याने अधिकाऱ्यांनी दोन्ही तरुणांची झाडाझडती घेतली. तरुणांचा एक्सरे काढल्यानंतर शरीरात सोन्याची पेस्ट असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, सोन्याची तस्करी करणारे दोघे आणि मदत करणाऱ्यावर दंडात्म कारवाई करण्यात आली आहे.