Gondia Tribal | गोंदियात आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची उंच भरारी, 6 विद्यार्थी करणार उत्तर भारताची विमानाने सफर

नेहा कोकोटे सह इतर विद्यार्थ्यांनीदेखील या एका महिन्याच्या प्रशिक्षणात शिकायला मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. दुसरीकडे उन्हाळी शिबिरासह विद्यार्थ्यांना नीट NEET आणि JEEE सारख्या स्पर्धा परीक्षांचे धडे या दरम्यान मिळाले. भविष्यात आम्ही देखील डॉक्टर, इंजिनियर बनू असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

Gondia Tribal | गोंदियात आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची उंच भरारी, 6 विद्यार्थी करणार उत्तर भारताची विमानाने सफर
गोंदियात आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची उंच भरारी
| Edited By: | Updated on: Jun 08, 2022 | 1:16 PM

गोंदिया : जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळेतील मुला-मुलींकरिता पहिल्यांदाच प्रकल्प कार्यालयाच्या वतीने शिबिर घेण्यात आलं. उन्हाळी शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना NEET आणि JEEE यासारख्या स्पर्धा परीक्षांचे धडे देण्यात आले. आदिवासी प्रकल्प अधिकारी (Tribal Project Officer) कार्यालया अंतर्गत 12 आदिवासी आश्रम शाळा चालविण्यात येतात. इतर खासगी शाळेप्रमाणे उन्हाळी शिबिराचा आनंद घेता यावे म्हणून हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा समारोप (Concluding of the Camp) करण्यात आला. या शिबिरात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. सहा विद्यार्थ्यांना उत्तर भारत फिरण्याकरिता विमान प्रवाशाची ( Air Travel) संधी मिळाली.

आदिवासी 12 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग

गोंदिया जिल्ह्यातील 12 आदिवासी आश्रम शाळेतील मुला मुलींनी या उन्हाळी शिबिरात सहभाग घेतला. पाच मे रोजी याची सुरवात करण्यात आली. 8 जूनला याचा समारोप करण्यात आला. एका महिन्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसह योगा, संगीत, तायकान्डो, पेंटींग, आत्मनिर्भरता आदी प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनादेखील ही संधी उपलब्ध झाली. प्रकल्प अधिकारी कार्यलयाचे आभार मानले. या समारोपीय कार्यक्रमाला जिल्हाधिकारी नयना गुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी अनिल पाटील यांनी हजेरी लावली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुढच्या वर्षी हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या शाळेत देखील राबवू असे अनिल पाटील म्हणाले. अशा नावीन्यपूर्ण उपक्रमाला कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचे नयना गुंडे म्हणाल्या.

NEET आणि JEEE सारख्या परीक्षांचे मार्गदर्शन

गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेला उपक्रम राज्यातील इतर आदिवासी आश्रम शाळेत राबविला जाणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी विकास रांचेलावर यांनी दिली. नेहा कोकोटे सह इतर विद्यार्थ्यांनीदेखील या एका महिन्याच्या प्रशिक्षणात शिकायला मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. दुसरीकडे उन्हाळी शिबिरासह विद्यार्थ्यांना नीट NEET आणि JEEE सारख्या स्पर्धा परीक्षांचे धडे या दरम्यान मिळाले. भविष्यात आम्ही देखील डॉक्टर, इंजिनियर बनू असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.