AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी, सरकारचा मोठा निर्णय, घडामोडींना वेग

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी, सरकारचा मोठा निर्णय, घडामोडींना वेग
Manoj Jarange PatilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 7:49 PM
Share

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. हे उपोषण निर्णयाक असेल असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे, तसेच मागण्या मान्य न झाल्यास मुंबईमध्ये आंदोलन करणार असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सरकारला 15 दिवसांची डेडलाईन दिली आहे. दरम्यान त्यानंतर आता सरकार दरबारी हालचाली वाढल्या असून, सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारचं शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट घेणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यांचं उपोषण सुरू आहे. त्यानंतर अखेर आता सरकारचं शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये येणार आहे. या शिष्टमंडळामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शुभराज देसाई, मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांचा समावेश असणार आहे. दरम्यान या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा होणार?  या आंदोलनावर काही तोडगा निघणार की आंदोलन सुरूच राहणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जरांगे पाटलांकडून मुंबईत आंदोलनाचा इशारा  

आपल्या आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान उपोषणाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी सरकारला इशारा देताना 15 दिवसांची डेडलाईन दिली आहे. जर 15 दिवसांमध्ये सर्व मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या 12 तारखेला महाराष्ट्रातील मराठा बांधवांची एक बैठक बोलावली जाईल, आणि या बैठकीत मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच हे आदोलन निर्णायक आंदोलन आहे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारदरबारी हालचालींना वेग आला आहे. उद्या सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येणार आहे. या शिष्टमंडळामध्ये  मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,  मंत्री शुभराज देसाई, मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांचा समावेश आहे.

Follow Us
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?