Air india ची खुशखबर, परीक्षेशिवाय सरकारी नोकरीची संधी

एअर इंडियामध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Air india recruitment) आहे.

Air india ची खुशखबर, परीक्षेशिवाय सरकारी नोकरीची संधी

मुंबई : एअर इंडियामध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Air india recruitment) आहे. एअर इंडिया अनेक पदं भरण्यासाठी अर्ज मागत आहे. यामध्ये मॅनेजर, ऑफिसर, ग्राहक एजेंटसह अनेक पदांचा समावेश आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली (Air india recruitment) जाईल.

या पदांसाठी अर्ज करु शकता

  • ड्यूटी मॅनेजर – 4 पदं
  • ड्यूटी ऑफिसर – 4 पदं
  • ज्यूनिअर एक्झेक्यूटिव्ह (टेक्निकल) – 10 पदं
  • मॅनेजर (फायनान्स) – 1 पद
  • ऑफिसर (अकाऊंट) – 1 पद, असिस्टंट (अकाऊंट) – 2 पदं
  • ज्यूनिअर एक्झिक्यूटिव्ह (पॅक्स) – 10 पदं
  • ज्यूनिअर एक्झिक्यूटिव्ह मानव संसाधन आणि प्शासनिक – 6 पदं
  • सीनिअर कस्टमर एजेंट – 10 पदं
  • कस्टमर एजेंट – 100 पदं
  • पॅरा-मेडिकल एजेंट – 12 पदं

असा करा अर्ज

योग्य उमेदवाराने अर्ज भरावा. त्यासोबत तुमची सर्व कागदपत्रे जोडा. या कागदपत्रांवर तुमची स्वाक्षरी करुन अर्ज करण्यासाठी कार्यालयात भेट द्या.

अर्जाची फी

सामान्य आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 500 रुपये

अनुसूचित जाति / जमातींमधील उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.

मुलाखतीचे ठिकाण

सिस्टम अँड ट्रेनिंग डिव्हिजन सेकेंड फ्लोर, जीएसडी कॉम्पलेक्स, सहारा पोलीस स्टेशनजवळ, एअरपोर्ट गेट नंबर 5, अंधेरी ईस्ट, मुंबई – 400099.

तारीख

मुलाखतीची तारीख 10 आणि 11 मार्च 2020 रोजी आहे.

निवड प्रक्रिया – पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारावर होईल.

वयोमर्यादा – उमेदवाराच्या वयोमर्यादेनुसार त्याची निवड होईल.

शैक्षणिक पात्रता – योग्य शैक्षणिक पदांनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.Air indi

नोकरीचे स्थान – मुंबई (महाराष्ट्र)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *