AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Crime : नर्तकीचे धक्कादायक कारनामे, बीडच्या माजी उपसरपंचाच्या मित्राचा खळबळजनक दावा, 21 वर्षांच्या पूजाने गोविंदसोबत…

Beed Crime Govind Barge Death Case : गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे. दररोज या प्रकरणात मोठे खुलासे होत असतानाच आता गोविंद बर्गे यांच्या मित्राने धक्कादायक दावा केलाय.

Beed Crime : नर्तकीचे धक्कादायक कारनामे, बीडच्या माजी उपसरपंचाच्या मित्राचा खळबळजनक दावा,  21 वर्षांच्या पूजाने गोविंदसोबत...
Govind Barge case
| Updated on: Sep 12, 2025 | 11:42 AM
Share

बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होतायत. गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्यावर गंभीर आरोप केली. मागील दीड वर्षांपासून गोविंद याचे पूजा गायकवाड हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. यादरम्यानच्या काळात गोविंदने पूजावर मोठा पैसा उडवला. फक्त पूजाच नाही तर पूजाच्या नातेवाईकांना देखील त्याने जमीन, गाड्या घेऊन दिल्या. पूजाला महागडे दागिने असो किंवा महागडे मोबाईल प्रत्येक गोष्ट गोविंद बर्गे याने पूजाला दिली. मात्र, पूजाला आता हवा होता तो म्हणजे गोविंद बर्गे याचा गेवराईतील बंगला.

गेवराईतील बंगला माझ्या नावे कर म्हणून पूजाने गोविंदवर एक दबाव टाकला. पण गोविंद बंगला तिच्या नावावर करत नसल्याने पूजाने त्याच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले. गोविंद इतका व्याकूळ झाला की, तिला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. तिथेही काहीच  होऊ शकले नसल्याने तिच्या घराबाहेर चारचाकी गाडीत बसून गोविंदने स्वत: थेट गोळी झाडली आणि स्वत:च्या आयुष्याचा शेवट केला.

आता नुकताच गोविंद बर्गे याच्या अत्यंत जवळच्या मित्राने नर्तकी पूजा गायकवाड हिच्याबद्दल धक्कादायक माहिती सांगितली आहे. गोविंद याचा जवळचा मित्र चंद्रकांत शिंदे यांनी सांगितले की, पूजा गायकवाड आणि तिच्या नातेवाईकांच्या सततच्या धमक्यांना गोविंद हा फार त्रस्त झाला होता आणि तो मानसिकदृष्ट्या या काळात पूर्णपणे खचला. तो मागील काही दिवसांपासून तणावात होता.

पूजाचे सासुरे गावातील घर बांधण्यासाठी गोविंदने मोठे पैसे दिले होते. फक्त हेच नाही तर पूजा गायकवाड हिला स्वत:चे कला केंद्र सुरू करायचे होते. याकरिता गोविंदने तिला थेट 8 लाख रूपये दिले होते. कोणत्या ना कोणत्या कारणावरून गोविंदकडून पूजा ही पैसे काढत होती. शेवटी गोविंदने या गोष्टींना त्रस्त होऊ हे पाऊल उचलल्याचे सांगितले जातंय. काही दिवसांपूर्वीच गोविंद याच्या गेवराईतील बंगलयाची वास्तूशांती झाली होती.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?