AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे अर्ध्या हळकुंडाने पिवळे, त्यांना काही कळतं का? गुणरत्न सदावर्ते चांगलेच संतापले; काय घडलं?

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. महिला आरक्षणा विधेयक नामंजूर झाल्यानंतर सदावर्ते यांनी संताप व्यक्त केला आहे.

राज ठाकरे अर्ध्या हळकुंडाने पिवळे, त्यांना काही कळतं का? गुणरत्न सदावर्ते चांगलेच संतापले; काय घडलं?
raj thackeray and gunaratna sadavarteImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 18, 2026 | 7:40 PM
Share

Raj Thackeray : महिलांसाठीच्या लोकसभेतील आरक्षण कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी तसेच मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारने विधेयक आणले होते. हे विधेयक मात्र बहुमताअभावी नामंजूर झाले. विधेयक मंजुरीसाठी पटलावर ठेवलेले असतानाच विरोधकांनी एकजूट दाखवल्याने विरोधक निष्प्रभ ठरले. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील केंद्र सरकारच्या या विधेयकाला विरोध केला आहे. सरकारने रात्री अधिसूचना काढून 2023 सालचा महिला आरक्षण कायदा लागू झाल्याचे घोषित केले. सरकारने एवढी घाई का केली? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच सरकारला नेमके काय साध्य करायचे होते? असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. दरम्यान, आता राज ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करताच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी समोर येत राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांना काय कळतं? असे म्हणत सदावर्ते यांनी खिल्ली उडवली आहे.

राज ठाकरे हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले

सदावर्ते यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांनी घेतलेल्या भूमिकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच राज ठाकरेंवरही टीका केली. राज ठाकरे यांना अनुसूचित जाती, जमातींचे खासदार वाढू द्यायचे नाहीत. राज ठाकरे हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत. त्यांना यांना काही समजत नाही, अशी जोरदार टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

राज ठाकरे यांचे सर्व उद्योग हे टेंडरशी…

राज ठाकरे यांना एससी, एसटी समाजाचे आमदार, खासदार नको आहेत. राज ठाकरे यांचा हाच वैचारिक डीएनए आहे. राज ठाकरे हे ओबीसींचे विरोधक आहेत, असा आरोपही सदावर्ते यांनी केला. तसेच राज ठाकरे यांचे सर्व उद्योग हे महापालिका, टेंडरशी संबंधित आहेत. परंतु राज ठाकरे हे संविधानाला, संविधानाला चुकीचे दर्शवत आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांचे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, इसा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, आता गुणरत्नन सदावर्ते यांनी केलेल्या आरोपांनंतर मनसे नेमके काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...