Gunratan Sadavarte : राज ठाकरे आई भवानीची शपथ घेऊन बोल हा मोर्चा तू..गुणरत्न सदावर्तेंची बेछूट टीका
Gunratan Sadavarte : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाकरे बंधु मोर्चा काढणार आहेत. त्यावर वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या शैलीत टीका केली आहे.

मागच्या आठवड्यात निवडणूक आयोगातील मतभेद समोर आले होते. इंडियन एक्सप्रेसने या संबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. दोन सहआयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं होतं. मागच्या दहा महिन्यात त्यांच्या आक्षेपांकडे ज्ञानेशकुमारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. ही बातमी समोर आल्यानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यासाठीच मुंबईत ठाकरे बंधुंनी 4 ऑक्टोंबरला महामोर्चाच आयोजन केलं आहे. त्यावर आज प्रसिद्ध वकिल गुणरत्न सदार्वेत यांनी टीका केली.
“नवीन निघालय ते काय ते युवकांना सगळ्या एकत्र करायचं. जेन झी सगळेच आहेत ते. केजरीवलाकडे कोण तो पोरगा कामाला होता, अभिजीत दीपके. त्या पोरांची लिटमस टेस्ट करतायत. तू काढून बघ एकदा मोर्चा, तुझ्या मोर्चाला गर्दी जमली, तर मग आमच्या मोर्चाल जमेल गर्दी” अशा शब्दात गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली. “राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना सेकंड मध्ये काम करायची सवय कधी लागली. आधी काँग्रेसने करुन पाहिलं. पण त्यांना जमलं नाही” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
शिक्षणासाठी हा मोर्चा काढताय का?
“राज ठाकरे आई भवानीची शपथ घेऊन बोल हा मोर्चा बेरोजगारीसाठी आहे का?. शेतकऱ्यांवर संकट आहे, त्यासाठी हा मोर्चा काढताय का?. आई भवानाची शपथ घेऊन बोल शिक्षणासाठी हा मोर्चा काढताय का?. हा मोर्चा काही गोष्टींची दिशाभूल करण्यासाठी आहे” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
4 तारखेला सकाळी 10 वाजता सर्वजण भायखळ्याच्या रिचर्डसन आणि क्रुडास कंपनीजवळ जमतील. तिथून 11 ते 11.30 वाजण्याच्या दरम्यान हा मोर्चा निघेल. हा मोर्चा छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाजवळ येईल. या ठिकाणी व्यासपीठ उभारलं जाईल. तिथेच सभेत रुपांतर होऊन मोर्चाची सांगता होणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. गुणरत्न सदावर्ते यांनी यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा सातत्याने टीका केली.
