एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत गुणरत्न सदावर्तेंचं मोठं भाकीत, थेट सांगूनच टाकलं…

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मंगळवारी दसरा मोळावा पार पडला, त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं भाकीत केलं आहे.

एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत गुणरत्न सदावर्तेंचं मोठं भाकीत, थेट सांगूनच टाकलं...
गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 4:15 PM

मंगळवारी राज्यभरात दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवारी राज्यात दसरा मेळाव्यांची धूम पहायला मिळाली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा, नारायणगड येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा, तर मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. दरम्यान या दसरा मेळाव्यावरून आता  ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  काल दसऱ्याच्या दिवशी शिमगा पाहिला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यातून तरी काहीतरी मिळेल असं वाटलं होतं, पण तिथेही शिमगाच झाला, असा टोला यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? 

Loading...

काल दसऱ्याच्या दिवशी शिमगा पाहिला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यातून तरी काहीतरी मिळेल असं वाटलं होतं, पण तिथेही शिमगाच झाला. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? दुसरा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांचा तोही तसाच.  उदय सामंत मनोज जरांगे पाटील यांना संघर्ष योद्ध म्हणायचे, यावेळी तर साधे दादा पण म्हटले नाहीत. मनोज जरांगे पाटील असंच म्हणाले. काल लोकांना त्रासदायक वाटत होते. तुम्ही लोकांना सण साजरा करून शुभेच्छा द्यायला बोलावता का शिव्या शाप ऐकायला? असा थेट सवालच यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वादात एकनाथ शिंदे हे एकदा मुख्यमंत्री झाले, पण आता मला वाटत नाही की ते पुन्हा मुख्यमंत्री होतील. ते एवढं सोपं नाही. आपला मुलगा कॅबिनेट मंत्री होईल, अशी आशा त्यांना आहे. मिलेगा मिलेगा असं म्हणून लोक तुम्हाला हारभाऱ्याच्या झाडावर चढवत आहेत, असंही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.  दरम्यान यापूर्वी देखील गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. दरम्यान आता शिवसेना शिंदे गटाकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या या टीकेवर काय प्रतिक्रिया येणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us