AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळीजच थरथरलं! आजोबांचं श्राद्ध करायला आला आणि तोही गेला… कल्याण शहर सुन्न

एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आजोबांच्या श्राद्धासाठी आलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना कल्याण-मुरबाड रोडवरील म्हारळ पाडा परिसरात घडली आहे.

काळीजच थरथरलं! आजोबांचं श्राद्ध करायला आला आणि तोही गेला… कल्याण शहर सुन्न
Kalyan AccidentImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 24, 2026 | 3:19 PM
Share

कल्याण-मुरबाड रोडवरील म्हारळ पाडा परिसरात हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. ओव्हरलोड डंपरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २५ वर्षीय वैभव साहेबराव भामरे यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे वैभव हे आपल्या आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी कल्याणमध्ये आले होते. विधी आटोपून परत जात असतानाच हा काळाने घाला घतला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

कल्याण-मुरबाड रोडवरील म्हारळ पाडा परिसरात हा भीषण अपघात झाला. ओव्हरलोड डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वार वैभव साहेबराव भामरे (वय २५) यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जबरदस्त होती की वैभव यांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही.वैभव हे मूळचे मालेगाव येथील रहिवासी असून आपल्या आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी कल्याण परिसरात आले होते. श्राद्ध विधी पूर्ण करून ते परतीच्या प्रवासाला निघाले मुरबाड वरून कल्याणच्या दिशेने येत असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

नेमकं काय घडलं?

कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कल्याण-मुरबाड रोडवरील ओव्हरलोड वाहनांच्या बेफिकीर वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नवापूरमध्ये देखील धक्कादायक घटना

नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथून देखील एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर अली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर एका भरधाव स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारने रस्त्यावरच ३ ते ४ पलट्या घेतल्या आणि कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.या अपघातामध्ये एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक जण मृत्यूशी झुंज देत आहे. आकाश आधारभाई पाटील असे मृत तरुणाचे नाव असून, तो गुजरातच्या सोनगड भागातील रहिवासी आहे. जखमी रोहित वाघ याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मात्र, या अपघातानंतर एक खळबळजनक बाब समोर आली आहे. अपघाताग्रस्त कारची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारूचे खोके आढळून आले आहेत. त्यामुळे ही भरधाव कार केवळ वेगामुळे उलटली की दारू तस्करी करताना पोलिसांच्या भीतीने चालकाचा ताबा सुटला? असा संशय आता व्यक्त केला जात आहे.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल