AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Airport : मोठी बातमी ! पुणे विमानतळावर थोडक्यात टळली मोठी दुर्घटना, हवाई दलाचं विमान.. नेमकं काय झालं ?

पुणे विमानतळावर काल रात्री भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा अपघात होता होता टळला. लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने धावपट्टी बंद करावी लागली. सुदैवाने वैमानिक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे नागरी उड्डाणे रद्द झाली किंवा वळवण्यात आली, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास झाला. धावपट्टी पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Pune Airport : मोठी बातमी ! पुणे विमानतळावर थोडक्यात टळली मोठी दुर्घटना, हवाई दलाचं विमान.. नेमकं काय झालं ?
पुणे विमानतळImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 18, 2026 | 8:57 AM
Share

पुणे विमानतळासंदर्भात एक मोठी, महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे एअरपोर्टवर मध्यरात्री एक मोठा अपघात होता होता टळला. लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ( 17 एप्रिल) हवाई दलाचे लढाऊ विमान क्रॅशलाईन झाले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून वैमानिक सुखरूप आहे तसेच नागरी मालमत्तेचे देखील नुकसान झालेलं नाही अशी माहिती हवाई दलाने दिली. मात्र या अपघातामुळे विमानतळावरील धावपट्टी ही बंद ठेवण्यात आली आहे. पुढील काही तासांसाठी तरी हा रनवे बंद राहणार असल्याचे समजते. कोणतेही मोठे नुकसान झाले नसले तरीही ही धावपट्टी मोकळी करून विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी आणखी काही तासांचा अवधी लागू शकतो.

दरम्यान पुणे विमानतळाची एकमेव धावपट्टी बंद झाल्यामुळे नागरी विमानांचे उड्डाण आणि आगमन ठप्प झाले होते. इंधनाची मर्यादा तसेच सुरक्षितता लक्षात घेऊन या विमानतळावर येणाऱ्या फ्लाईट्स, गुजरात मधील सुरत आणि गोव्यातील मोपा विमानतळाकडे वळवण्यात आली. मात्र यामुळे प्रवाशांना मोठा फटका, बसला, अनेकांचा खोळंबा झाला

दरम्यान यासंदर्भात भारतीय हवाईदलाकडून सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर एक पोस्ट करण्यात आली आहे. ” भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्यामुळे पुणे धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. विमानातील कर्मचारी सुरक्षित असून कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही” असं त्यात नमूद करण्यात आलं. “धावपट्टी पुन्हा सुरू करून शक्य तितक्या लवकर कामकाज पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.” असंही त्या पोस्टमध्ये लिहीण्यात आलं होतं.

पुणे विमानतळ ‘दुहेरी-वापर मॉडेल’वर चालतं, ज्यामध्ये नागरी व्यावसायिक उड्डाणे आणि एक सक्रिय हवाई दल तळ यांचा समावेश आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की हवाई दलाच्या विमानाने ‘हार्ड लँडिंग’ केलं होतं, मात्र त्यांनी या संदर्भात अधिक तपशील देण्यास नकार दिला.

नेमकं झालं तरी काय ?

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे 10:25 वाजता लँडिंग करताना भारतीय हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला. यामुळे विमानाला जोरदार धक्का बसला आणि त्यानंतर संपूर्ण धावपट्टी बंद करण्यात आली. “भारतीय हवाई दलाच्या एटीसीनुसार, धावपट्टी मोकळी करून कामकाज पूर्ववत करण्यासाठी ४-५ तास लागतील.” असंही त्यांनी सांगितलं.

मुरलीधर मोहोळ यांनी काय सांगितलं ?

दरम्यान, या अपघातनंतर विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळाच्या रनवेवरील कामकाज ठप्प झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली. ” पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचे कामकाज सध्या भारतीय हवाई दलाच्या विमानाच्या घडलेल्या घटनेमुळे तात्पुरते स्थगित करण्यात आलं आहे. सुदैवाने, विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.” असं त्यांनी सांगितलं. ” या संदर्भात सर्व संबंधित विमान कंपन्यांना सूचित करण्यात आले असून, धावपट्टी पूर्ववत करून नियमित सेवा सुरू होण्यासाठी अंदाजे ५ तासांचा कालावधी लागू शकतो.परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी मी स्वतः विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे.” असंही त्यांनी नमूद केलं.

अनेक विमानं रद्द 

हवाईदलाच्या विमानाचे हार्ड लँडिग झाल्यानंतर पुणे विमानतळावर विमानांची वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक विमानं रद्द झाली.  इंडिगोची येणारी 31 आणि जाणारी 34 अशी एकूण 65 विमाने रद्द झाली.  तर एअर इंडियाची येणारी 3 आणि जाणारी 3 विमानं रद्द तर स्पाईस जेटचीही येणारी 2  दोन आणि जाणारी 3 विमाने रद्द, तसेच एयर इंडिया एक्सप्रेसचीही 10 विमाने रद्द झाली आहेत.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका