AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेंची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी, 12 दिवसात कोरोनावर मात

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी कोरोनावर मात केली आहे. (IAS Officer Tukaram Mundhe Corona Negative)

Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेंची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी, 12 दिवसात कोरोनावर मात
| Updated on: Sep 06, 2020 | 10:45 PM
Share

मुंबई : नागपूरचे माजी आयुक्त आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. तुकाराम मुंढेंना 25 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 12 दिवसांनी तुकाराम मुंढेंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. (IAS Officer Tukaram Mundhe Corona Negative)

“माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोरोनाचा लढा हा सकारात्मक विचार आणि कृतीतून लढता येतो. सशक्त इच्छाशक्ती, केंद्रीत लक्ष आणि संयुक्त प्रयत्नांची त्याला जोड आवश्यक आहे,” असे ट्विट तुकाराम मुंढेंनी केले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी फेसबुक पोस्ट लिहित जनतेला आवाहन केलं होतं. “मागील साडे पाच महिने कोरोनाशी लढत असताना 24 ऑगस्ट रोजी माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. लक्षणे नसल्यामुळे मात्र पॉझिटिव्ह आल्याने शासनाच्या गाईडलाईन्सनुसार मी स्वतःला गृह विलगीकरणात ठेवले. या काळात गृह विलगीकरणाचे सर्व नियम मी पाळत आहे. मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्य मी असलेल्या खोलीत न येणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, थर्मल स्कॅनिंग द्वारे ठराविक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिर्देशांचे पालन करीत आहे.”

“ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटीव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी. ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. या शुभेच्छासोबतच सर्व नियम पाळत विलगीकरणाचा काळ मी पूर्ण करेन, असा विश्वास देतो,” असंही तुकाराम मुंढे यांनी नमूद केलं. त्यांनी आपल्या पोस्टची सुरुवात आणि शेवट ऑल इज वेल असं लिहून केली. यातून त्यांनी सर्व काही ठिक आहे, असाच संदेश दिला आहे.

हेही वाचा –  Tukaram Mundhe Corona | ‘ऑल इज वेल’, तुकाराम मुंढेंची फेसबुक पोस्ट

दरम्यान, तुकाराम मुंढे यांची नुकतीच पुन्हा एकदा बदली झाली. नागपूर आयुक्तपदावरुन बदली करुन त्यांना मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव नियुक्ती देण्यात आली आहे. त्याआधीच तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली होती.

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त म्हणून कडक निर्बंध आणल्याचे दिसत होते. मात्र यावरुनच महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे तीव्र मतभेद पाहायला मिळाले. मात्र, आता त्यांच्या बदलीवरुन नागरिकांमध्ये नाराजी दिसत आहे. नागरिकांकडून या बदलीच्या विरोधासाठी आंदोलनाचीही तयारी सुरु आहे. (IAS Officer Tukaram Mundhe Corona Negative)

संबंधित बातम्या : 

Tukaram Mundhe | आपण नक्की जिंकू, आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, नागपूरचे धडाकेबाज महापालिका आयुक्त आता मुंबईत!

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.