'.....तर ओवेसींना कोल्हापुरातून परत जाऊ देणार नाही'

कोल्हापूर: सकल मराठा समाजाने एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींच्या सभेला विरोध केला आहे. मराठा समजाविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्यास, ओवेसींना परत जाऊ देणार नाही, असा थेट इशारा सकल मराठा समाजाने दिला. भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसींच्या वंचित बहुजन विकास आघाडीने कोल्हापुरात 12 फेब्रुवारीला विजय संकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी खासदार असदुद्दीन ओवेसी कोल्हापुरात …

Today Trending News, ‘…..तर ओवेसींना कोल्हापुरातून परत जाऊ देणार नाही’

कोल्हापूर: सकल मराठा समाजाने एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींच्या सभेला विरोध केला आहे. मराठा समजाविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्यास, ओवेसींना परत जाऊ देणार नाही, असा थेट इशारा सकल मराठा समाजाने दिला. भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसींच्या वंचित बहुजन विकास आघाडीने कोल्हापुरात 12 फेब्रुवारीला विजय संकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी खासदार असदुद्दीन ओवेसी कोल्हापुरात येणार आहेत. मात्र ओवेसींनी वादग्रस्त, चिथावणीखोर आणि मराठी समाजाविरोधात प्रक्षाभक वक्तव्य केल्यास, त्यांना परत जाऊ देणार नाही, असा इशारा मराठा समाजाने दिला.

यापूर्वी असदुद्दीन ओवेसी यांनी केलेली वक्तव्ये पाहता, कोल्हापुरातील मराठा समाजाने हा पवित्रा घेतला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ नसल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारे ओवेसी हे वंचित बहुजन विकास आघाडीच्या विजय संकल्प मेळाव्यासाठी 12 तारखेला कोल्हापुरात येत आहेत. त्यामुळे इथे सुद्धा अशी प्रक्षोभक वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करतील अशी शंका मराठा समाजाने व्यक्त केली आहे. त्यांनी अशी विधाने करुन तेढ निर्माण केल्यास त्यांना कोल्हापुरातून परत जाऊ देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला.

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या आंदोलनात कोल्हापूरचा मुस्लिम समाज अग्रभागी होता. याचा अभ्यास करुनच त्यांनी कोल्हापुरात पाऊल ठेवावे असा इशारा या निमित्ताने मराठा समाजाने दिला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *