फडणवीसांनी हिंमत असेल तर दिल्ली एअरपोर्टचे त्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज दाखवावे, रोहित पवार म्हणाले अन्यथा…
व्ही. के. सिंग यांनी देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली विमानतळावर भेट घेतली होती. त्या रात्रीचे दिल्ली विमानतळावरच सीसीटीव्ही फूटेज त्यांनी हिंमत असेल तर दाखवून निर्दोषत्व सिद्ध करावे असे चॅलेंज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहे.

अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूचे गुढ वाढतच चालले आहे. या २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या या विमान अपघाताला नऊ महिने पूर्ण झाले तरी एफआयआर दाखल झाली नसल्याचे सांगत आज शरद पवार यांचे नातू राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी पुन्हा विमान अपघाताचे प्रेझेटेंशन सादर करत नवे आरोप केले आहेत.
रोहित पवार यांनी गेले अनेक दिवस या विमान कंपनी आणि कंपनीच्या मालकाला वाचवणाऱ्या मफलर मॅनचा खुलासा मी करणार असल्याचे सांगत वातावरण तापवले होते. आज त्यांनी या प्रकरणात एक फोटो सादर करुन तो मफलर मॅन आणखी कोणी नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे जाहीर करुन सर्वांना धक्का दिला आहे. या वेळी रोहित पवार यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांनीच अपघात घडवल्याचे म्हणत नाही. परंतू ते या विमान कंपनीला वाचवत असल्याचा दावा केला. दरम्यान, रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची व्ही.के. सिंग सोबत दिल्लीच्या एअरपोर्टवर रात्री भेट झाली. देवेंद्र फडवणीस यांनी हिंमत असेल दिल्लीच्या एअरपोर्टची सीसीटीव्ही दाखवावे असे आव्हानही रोहित पवार यांनी दिले आहे.