Weather Alert | मराठवाडा, कोकणासाठी साठी पुढचे तीन तास महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Weather Alert | पुढच्या तीन तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामानतजज्ञ के. एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

Weather Alert | मराठवाडा, कोकणासाठी साठी पुढचे तीन तास महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
पाऊस

मुंबई: भारतीय हवामान विभागनं मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढच्या तीन तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामानतजज्ञ के. एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. नांदेड , हिंगोली , परभणी , जालना , बीड जिल्ह्यात पुढच्या तीन तासात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30 – 40 प्रति किलोमीटर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना वादळी वारे आणि पावसामध्ये घराबाहेर पडू नये, असा सल्ला हवामान खात्यानं दिला आहे. (IMD issue heavy rainfall alert for Marathwada districts Nanded Hingoli Parbhani Jalana Beed )

के.एस.होसाळीकर यांचं ट्विट

कोकणातही पावासाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या तिन्ही जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस

वाशिम जिल्ह्यातील कामरगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला होता. यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यास मदत होणार आहे.

मुंबईत पावसाची उसंत  

सध्याची वाऱ्यांची दिशा पाहता मुंबई आणि शेजारील उत्तर कोकणातील भागात मध्ये आज मुसळधार पाऊस शक्यता नाही पण हलक्या मध्यम सरी दुपारनंतर किंवा सायंकाळी होतील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

रत्नागिरीत सकाळपासून पावसाची विश्रांती

रत्नागिरीमध्ये सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. रात्रभर रत्नागिरीमध्ये पावसाच्या धारा  कोसळल्या होत्या. हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय.  किनारपट्टी भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

Rain Live Updates | मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा , पुढच्या तीन तासात जोरदार पावसाचा इशारा

Mumbai Rains : पुढील दीड महिना नो टेन्शन! मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI