IMD Maharashtra Weather Update : आज गणेशचतुर्थी कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? मुंबई-पुण्यात पाऊस कोसळणार का?

IMD Maharashtra Weather Update : गणेशोत्सवाला सुरुवात होण्याच्या बरोबर एक दिवस आधी काल मुंबापुरीत जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे आज आणि पुढचे दहादिवसही असाच पाऊस कोसळणार का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्याचं उत्तर जाणून घ्या.

IMD Maharashtra Weather Update : आज गणेशचतुर्थी कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? मुंबई-पुण्यात पाऊस कोसळणार का?
Raining
| Updated on: Sep 14, 2026 | 8:50 AM

मागच्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस काल अचानक परतला. गणेशोत्सवाला सुरुवात होण्याच्या बरोबर एकदिवस आधी आलेल्या पावसामुळे मुंबापुरीत गणेश भक्तांचे हाल झाले. बाप्पाच्या आगमानची लगबग सुरु असताना अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडलं. जुलै मध्ये मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर पावसाने ओढ दिली. श्रावण महिन्यात पावसाची एखाद दुसरी सर येऊन जायची. पण काल बाप्पाच्या आगमनाच्या एकदिवस आधी पावसाने सकाळपासून जोर धरला होता. त्यामुळे खरेदीसाठी निघालेल्या गणेश भक्तांचे हाल झाले. पावसाचं कालचं रुप पाहून सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, आता गणपतीचे दहादिवस हा पाऊस असाच कोसळणार का?. हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो? जाणून घ्या.

आज 14 सप्टेंबर गणेश चतुर्थी आहे. गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे. आजही काही भागात पाऊस कोसळेल. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि पुण्यात ढगांची दाटी असेल. पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या काही भागात मेघ गर्जनेसह पाऊस होईल. त्यामुळे आजही सर्वांचे डोळे आभाळाकडे असतील. ब्रेकनंतर परतलेला पाऊस ही बळीराजासाठी चांगली गोष्ट आहे. पण शहरांमध्ये मात्र पावसामुळे गणेशोत्सवाचा उत्साह थोडा कमी होऊ शकतो.

मुंबईत कसं असेल हवामान ?

मुंबईत 14 सप्टेंबरला आकाशात ढगांची दाटी असेल आणि पावसाची शक्यता आहे. IMD च्या ताज्या अपडेटनुसार मुंबईत हलका पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी शहर आणि उपनगरात अधनं-मधनं पाऊस कोसळत राहील.

पुण्यात कसं असेल हवामान?

पुण्यात आज 14 सप्टेंबरला ढगांची दाटी असेल. हलका पाऊस कोसळू शकतो. तापमान 23 ते 29 डिग्री सेल्सियस दरम्यान असेल. पुण्याच्या काही भागात IMD ने मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.

उद्धव ठाकरे मुंबईच्या राजाच्या दर्शनाला किती वाजता येणार?

नागूपरमध्ये 14 सप्टेंबरला दुपारी आणि संध्याकाळच्यावेळी पावसाची शक्यता आहे. IMD विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. इथे तापमान 23 ते 30 डिग्री सेल्सियर दरम्यान असेल.

नाशिकमध्ये कसं असेल हवामान?

नाशिकच्या आकाशात आज पावसाचे ढग असतील. मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळू शकतो. साताऱ्यातही पाऊस कोसळू शकतो. अकोल्यातही पावसाचा अंदाज आहे. IMD ने हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us