AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेवर घेतला जाणार सलग 18 तासांचा मेगा ब्लॉक

मोठी बातमी समोर येत आहे, मध्ये रेल्वेवर तब्बल 18 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून, या काळात रेल्वेचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेवर घेतला जाणार सलग 18 तासांचा मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉग Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2025 | 9:32 PM
Share

लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन मानलं जातं. जर लोकला पाच मिनिटं वेळ झाला तर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पहायला मिळते, दूरवरून ऑफिसला येणाऱ्या लोकांसाठी मुंबईमध्ये लोकल हाच एकमेव आणि स्वस्त वाहतुकीचा पर्याय आहे. मात्र आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मध्य  रेल्वेवर तब्बल 18 तासांचा एक सलग मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता असून, प्रवाशांचे हाल होऊ शकतात. या 18 तासांच्या सलग एक मेगा ब्लॉकसोबतच इतर छोटे-छोटे आणखी सात ब्लॉक देखील घेतले जाणार आहेत, त्यामुळे या काळात रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे.

मुंबईतील प्रसिद्ध असलेला एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी मध्य रेल्वेने एकूण आठ ब्लॉक घेण्याची तयारी दर्शवली आहे. यापैकी एक ब्लॉक सलग 18 तासांचा घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल ट्रेन आणि मेल-एक्स्प्रेसची प्रवासी सेवा दिवसरात्र कोलमडन्याची शक्यता आहे.  महारेलच्या विनंतीनुसार एल्फिन्स्टन पूलाच्या पाडकामासाठी एक सलग 18 तासांचा मेगा ब्लॉक तर इतर छोटे-छोटे दोन -दोन तासांचे एकूण सात ब्लॉक घेण्यात येणार आहेत, यासाठी मध्ये रेल्वेच्या विभागीय पातळीवरून मंजुरी देण्यात आली आहे.

वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या कामासाठी 125 वर्षा जुना असलेला एल्फिन्स्टन पूल पाडण्याचं काम सुरू आहे.  पुलाचा पूर्व आणि पश्चिमेकडील भाग जमीनदोस्त करण्यात आला आहे, मात्र रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम जवळपास महिनाभरापासून ठप्प आहे. आता त्यासाठीच मध्य रेल्वेवर सलग 18 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

प्रवाशांचे हाल 

दरम्यान या मेगा ब्लॉक काळात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. या ब्लॉकचा परिणाम हा लोकल रेल्वेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर देखील होऊ शकतो. त्यामुळे या काळात प्रवाशांना रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा लागणार आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?