Shivendra Raje Bhosale : ‘जो आपल्याला नडतो, त्याला टप्प्यात आल्यावर..’ शिवेंद्रराजे भोसले यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा

Shivendra Raje Bhosale : पाच दिवसांपूर्वी ‘छत्रपती घराण्याची कवच कुंडले काढून निवडणुकीत उतरा’ या शिवसेना प्रवक्ते अंकुश कदम यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला होता.

Shivendra Raje Bhosale : जो आपल्याला नडतो, त्याला टप्प्यात आल्यावर.. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा
Shivendra Raje Bhosale
| Updated on: Nov 17, 2026 | 1:27 PM

साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे. “जो आपल्याला नडतो, त्याला टप्प्यात आल्यावर डोक्यावर टाकतोच. एकनिष्ठ आणि विश्वासू राहणाऱ्या कार्यकर्त्यालाच पदाची लॉटरी लागते” असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. “त्यामुळे अधे-मधे वळण न घेता थेट बंगल्यात या” असा सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. “अनेकांना वाटते की बाबांना काही कळत नाही, पण कोणाला कधी आणि कुठे डोक्यावर टाकायचे हा वडिलांकडून शिकलेला कुस्तीतला डाव मला चांगलाच ठाऊक आहे” असं ते म्हणाले. “जो आपल्याला नडतो त्याला सहा महिने किंवा वर्षभराने का होईना, पण टप्प्यात आल्यावर बरोबर डोक्यावर टाकायचे आणि आपण बाहेर पडायचे” असा सूचक राजकीय इशाराही शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी दिला.

पाच दिवसांपूर्वी ‘छत्रपती घराण्याची कवच कुंडले काढून निवडणुकीत उतरा’ या शिवसेना प्रवक्ते अंकुश कदम यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला होता. “मी छत्रपतींचा वारस आहे म्हणून मला निवडून द्या, असे मी आजवर लढलेल्या चारही निवडणुकांमध्ये कधीही म्हटलेले नाही. मला माझ्या घराण्याचा सार्थ अभिमान आहे, मात्र राजकारणासाठी आणि निवडून येण्यासाठी मी कधीही घराण्याच्या नावाचा वापर केलेला नाही, तर माझ्या कामाच्या जोरावरच मते मागितली आहेत,” असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले होते.

Loading...

इतर वेळी तो मुंबईला का निघून जातो?

“जनतेच्या मनात राजघराण्याबद्दल प्रेम आणि श्रद्धा आहेच, पण ज्यांच्याकडे स्वतःचे असे काहीच सांगण्यासारखे नाही आणि ज्यांना आरोप करता येत नाहीत, तेच लोक पळवाट काढण्यासाठी आणि शब्दांचा खेळ करून महाराज आणि सामान्य जनता अशी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत” असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. निवडणुका आल्यावरच विरोधकांचा ‘जावळीचा स्वाभिमान’ कसा जागा होतो आणि इतर वेळी तो मुंबईला का निघून जातो? असा खोचक सवालही शिवेंद्रराजे यांनी यावेळी केला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांची सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर पकड आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us