AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीयाचं पथक लातूरमध्ये आलं अन् लिफ्टमध्ये अडकलं, नेमकं काय घडलं?

मोठी बातमी समोर येत आहे, सीबीआयचं पथक आज चौकशीसाठी लातूरमध्ये आलं होतं, मात्र याचदरम्यान सीबीआयचे अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली आहे. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांना लिफ्टमधून बाहेर काढण्यात आलं.

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीयाचं पथक लातूरमध्ये आलं अन् लिफ्टमध्ये अडकलं, नेमकं काय घडलं?
सीबीआयचं पथक लिफ्टमध्ये अडकलं Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 21, 2026 | 8:02 PM
Share

मेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेशासाठी नीट परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु या परीक्षेला आता पेपरफुटीचं ग्रहण लागलं आहे. नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. संतापाचं वातावरण पहायला मिळालं, नीटचा पेपर फुटल्याचं समोर आल्यानं अखेर सरकारने ही परीक्षा रद्द केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत सीबीआयने काही जणांना अटक केलं असून, त्यांच्या चौकशीमधून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

नीट पेपर फुटी प्रकरणात आता लातूरमधून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या प्रकरणात पहिल्यांदाच सीबीआयने पालकावर कारवाई केली आहे.  डॉ. मनोज शिरुरे यांना अटक करण्यात आली आहे, त्यांना लातूरमधून अटक करण्यात आली. लातूरमधून ही तिसरी अटक आहे. डॉ. मनोज शिरुरे हे बालरोग तज्ज्ञ असून, ते यापूर्वी याच प्रकरणात अटक झालेल्या पी व्ही कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केल्यानंतर आता सीबीआयकडून लातूरमधील मनोज शिरुरे यांच्या घरी, हॉस्पिटलमध्ये आणि बाजूच्या अपार्टमेंटमध्ये देखील चौकशी करण्यात आली.  याचदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला तो म्हणजे मनोज शिरुरे यांच्या घराशेजारी असलेल्या मयुरेश्वर अपार्टमेंटमध्ये चौकशीसाठी जात असताना सीबीआय पथक लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली, मध्येच विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे सीबीआय पथक लिफ्टमध्ये अडकलं, त्यानंतर थोड्याच वेळात त्यांची लिफ्टमधून सुटका करण्यात आली.    दरम्यान दुसरीकडे अंबाजोगाई येथील दोन विद्यार्थ्यांची देखील सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर या विद्यार्थ्यांना सीबीआयने सोबत घेतल्याची माहिती समोर येत आहे.

कोण आहे मनोज शिरुरे?  

या प्रकरणात पहिल्यांदाच सीबीआयने पालकावर कारवाई केली आहे.  डॉ. मनोज शिरुरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज शिरुरे हे कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्या संर्पकात होते, अशी माहिती समोर येत आहे. मनोज शिरुरे याने मोटेगावकर याच्याकडून पेपर घेतल्याचा आरोप आहे. मुलासाठी त्याने पेपर घेतल्याचा आरोप आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल