AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन करा; बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या पोलीस महासंचालकांना सूचना

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना काही सूचना केल्या आहेत, तसेच गोरक्षकांवर हल्ले होता कामा नये, असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन करा; बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या पोलीस महासंचालकांना सूचना
Rahul NarvekarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 25, 2026 | 5:09 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना काही सूचना दिल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आवश्यक त्या उपाययोजना करा, गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन करा, तसेच गोरक्षकांवर हल्ले होणार नाहीत याची खबरदारी घ्या असं म्हटलं आहे. मालेगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, सातारा, धाराशिव, धुळे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होण्याची शक्यता अधिक आहे, त्यामुळे बकरी ईद काळात या शहरांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कुठेही गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.

नेमकं काय म्हणाले नार्वेकर? 

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आवश्यक त्या उपाययोजना करा, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तसेच  गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन करा, गोरक्षकांवर हल्ले होता कामा नये, याची खबरदारी घ्या, असंही नार्वेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर  मालेगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, सातारा, धाराशिव, धुळे, सोलापूर या शहरांवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे.

नितेश राणे यांची प्रतिक्रिया 

दरम्यान दुसरीकडे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक परिपत्रक काढलं आहे, प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये हे परिपत्रक देण्यात आलं आहे. बकरी ईदच्या दिवशी कुठेही  गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होणार नाही, यांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार, असं यावेळी मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. दरम्यान  कत्तलखान्यांवर कारवाई सुरू आहे. अशा ठिकाणी छापे टाकण्याचं काम आमचे पोलीस करत आहेत, कारवाई होणार आहे. असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. ते रविवारी नेरळमध्ये बोलत होते. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता तयारीला सुरुवात केली आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा