AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाची इंडिया आघाडीला पुन्हा तीच मागणी, लोकसभेपूर्वी वितंडवाद होणार? काँग्रेसला मोठं टेन्शन

'इंडिया' आघाडीच्या बैठकीपूर्वी ठाकरे गटाने पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करण्याची जुनीच मागणी पुन्हा लावून धरली आहे. उद्धव ठाकरेंच्या या आग्रही भूमिकेमुळे काँग्रेसची चिंता वाढली असून आघाडीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या सविस्तर.

ठाकरे गटाची इंडिया आघाडीला पुन्हा तीच मागणी, लोकसभेपूर्वी वितंडवाद होणार? काँग्रेसला मोठं टेन्शन
india alliance
| Updated on: Jun 08, 2026 | 11:21 AM
Share

सध्या राज्यातील राजकारणासह देशभरातील राजकारणातील घडामोडी वेगाने सुरु आहेत. त्यातच आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र तरी इंडिया आघाडीतील अंतर्गत मतभेद आणि मागण्यांमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा इंडिया आघाडीसमोर तीच जुनी आणि आग्रही मागणी ठेवली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत नव्या वादाला तोंड फुटणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.  इंडिया आघाडीच्या आगामी महत्त्वाच्या बैठकीबाबत बोलताना खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेऊन ही बैठक बोलावली असून, उद्धव ठाकरे मुंबईतून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. देशातील विद्यमान सरकार हटवणे हाच या बैठकीचा मुख्य अजेंडा आहे, असे संजय राऊत म्हणाले. मात्र, याच वेळी त्यांनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठाकरे गटाची मागणी काय?

संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे यांची पहिल्यापासूनच एक ठाम भूमिका राहिली आहे. निवडणुकीला सामोरे जाताना आपण पंतप्रधानपदासाठी एक चेहरा जनतेसमोर आणायला हवा. महाविकास आघाडीच्या वेळी चेहरा जाहीर करायला उशीर झाला, ज्याचा फटका आपल्याला बसला. २०२४ मध्येही आमची हीच भूमिका होती आणि आता आगामी निवडणुकांना सामोरे जातानाही आपण पंतप्रधानपदाचा चेहरा निश्चित करूनच लोकांसमोर गेले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसला टेन्शन का?

‘इंडिया’ आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आघाडी पुढे जात आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जींचा पुढाकार आणि त्यातच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी लावलेला तगादा यामुळे काँग्रेस बॅकफूटवर येण्याची शक्यता आहे. आता इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार? यावरून घटका पक्षांमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
NCP Marger News | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली!
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले