Maharashtra Weather Update : अतिमुसळधार पावसाचा इशारा, राज्यात धो धो पाऊस, मुंबई, पुणे, रायगडसह..

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील काही तासात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगडला हा इशारा देण्यात आला.

Maharashtra Weather Update : अतिमुसळधार पावसाचा इशारा, राज्यात धो धो पाऊस, मुंबई, पुणे, रायगडसह..
Maharashtra Weather
| Updated on: Jul 21, 2026 | 12:22 PM

राज्यात हवामानात सतत बदल होत आहे. त्यामध्येच कालपासून जोरदार पावसाला अनेक भागात सुरूवात झाली. काल रात्री मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला. आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला. रोहतक, वाराणसी, पुरूलिया ते ईशान्य बंगालपर्यंत 900 मीटर उंचींपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. यासोबतच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिसा ते बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पुणे, मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा आहे.

यासोबतच नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, जालना या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. बाकी राज्यात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस राज्यात पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. हा शेतकऱ्यांना मोठा दिलासा म्हणावा लागेल.

पिंपरी-चिंचवडची तहान भागवणाऱ्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी सुरूच आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, सध्या पवना धरण 82.42 टक्के भरले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणातील पाणीसाठा 77.28 टक्के होता. गेल्या 24 तासांत पाणलोट क्षेत्रात 46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नागपूरसह परिसरात सकाळपासून संततधार पावसाला सुरुवात झालीय.

आणखी दोन दिवर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्यात जून महिन्याच्या शेवटी पावसाने हजेरी लावली. जुलै महिन्यात दमदार पावसाची नोंद झाली. त्यानंतर आठ दिवस पावसाचा पत्ता नव्हता, आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला. पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढेल. इतर राज्यातही पाऊस सुरू आहे. पावसाने हाहाकार उत्तरेकडील राज्यात माजवला आहे. त्यामध्येच राज्यातही पावसाचा इशारा देण्यात आला.

Follow Us