AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस बरसणार, मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यात..

Maharashtra Weather Update : राज्यात आज अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याचे बघायला मिळतंय. भारतीय हवामान विभागानेही पावसाचा मोठा इशारा दिला. आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस बरसणार, मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यात..
Maharashtra Weather
| Updated on: Jul 20, 2026 | 7:16 AM
Share

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळत आहे. आज विदर्भ, पुणे, मराठवाडा परिसरात पावसाची शक्यता आहे. त्यामध्येच मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला. श्रीगंगानगर, हरदोई, रांची, सागर बेटे, वाराणसी ते बंगालच्या उपसागरात 1.5 किलोमीटर उंचीने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. उत्तर बिहारपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यात कमी दाबाचा पट्टा स्थिर आहे. जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसा इशारा हवामान विभागाने दिला. पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरातही जोरदार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचा आहे.

आज मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. जोरदार पाऊस कोसळत आहे. रात्रभर अनेक भागात पाऊस होता. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामध्येच रात्रीपासूनच पाऊस सुरू झाला. पेरण्या केल्यानंतर समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते, त्यांना मोठा दिलासा मिळाला.

कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार सुरू आहे. शाळकरी विद्यार्थ्यांची पाण्यातून वाटचाल सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीत काल सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. रात्रीही अधूनमधून जोरदार सरींनी हजेरी लावली.  कल्याणमधील छत्रपती शिवाजी चौक, गुरुदेव हॉटेल रोड आणि आंबेडकर रोड परिसरात पावसाचे पाणी साचले. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागला.

सखल भागांमध्ये तात्पुरत्या वाहतूक आणि नागरिकांची काही काळ गैरसोय झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील सखल रस्त्यांवर पुन्हा पाणी साचण्याची शक्यता आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. एक आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा चांगला पाऊस बरसताना दिसत आहे. हा शेतकऱ्यांसाठी दिलासा नक्कीच म्हणावा लागेल. सर्वदूर पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...